इतरउत्तर महाराष्ट्रकृषीनाशिकराज्य

दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई : खोत

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(नाशिक ) – जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी सरकार कटिबद्ध राहील. कर्ज वसुलीसाठी जमीन लिलावाच्या बॅंकांना तात्काळ सदर वसुली थांबवण्याच्या सूचना देण्यात येतील.

तसेच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करताना प्रशासनाने यामध्ये कुठेही दिरंगाई केल्यास त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी दिला.

नाशिक जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी (ता. १) खोत हे एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर होते. या वेळी चांदवड तालुक्यातील वडाळी भोई येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सोमनाथ जाधव यांच्या द्राक्ष आणि मिरचीच्या क्षेत्राला भेट देत पाहणी केली. यानंतर बागलान तालुक्यातील ठेंगोडे येथील शेतकरी दिनेश रकीबे यांच्या द्राक्षेबागेची पाहणी केली.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सदाभाऊ खोत यांनी प्रशासनाला दिले. या वेळी तेथे जमलेल्या शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत प्रशासनास आदेश दिले.

यानंतर बागलाण तालुक्यातील बिजोटे येथील गोपाल जाधव यांच्याकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रोटोकाॅलचा विचार न करता एक शेतकऱ्याची मोटारसायकल घेऊन त्याच्या शेतात गेले व पाहणी केली आणि त्वरीत त्याचा पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: