इतरकोकणगुन्हेविश्वरत्नागिरीराज्य

चिपळूण येथे चोरट्यांनी एटीएम फोडले

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(चिपळूण रत्नागिरी) – चिपळूण बस स्थानकाच्या मागील बाजू असलेले बँक ऑफ “इंडियाचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड लंपास केल्याची घटना रविवारी (ता. ३) सकाळी उघडकीस आली.

या घटनेमुळे शहरातील एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रविवार असल्याने बँकेला सुट्टी होती. त्यामुळे बँकेकडून तक्रार दाखल झाली नाही. मात्र, संबंधित बँकेचेही एटीएमच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याची बाब या प्रकारातून पुढे आली आहे.

संशयितांनी गॅस कटरने एटीएम फोडून यातील रोकड लंपास केली. या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद नाही. त्यामुळे किती रोकड चोरीला गेली याचा आकडा मिळू शकला नाही. चिपळूण पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: