इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्यसामाजिकसामाजिक संस्था

कातकरी महिलांना साड्या देऊन केली दिवाळी साजरी; सुदीक्षा फाऊंडेशनचा उपक्रम

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – दिवाळीचा पहिला दिवस सुदीक्षा फाऊंडेशने मुळशी तालुक्यातील कोळवण मधील कातकरी महिलांना दिवाळी भेट म्हणून साड्या देऊन साजरा केला. सुदीक्षा फाऊंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा उमा गोपाळे विश्वनाथन यांनी या प्रसंगी महिलांना सक्षम व स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. सर्व अडचणींना सामोरे जाऊन जगण्याची जिद्द अंगी असेल तर स्त्रिया आपले जीवन घडवू शकतात असे विचार त्यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले महिला जागृती मंच यांच्या वतीने राखी रासकर यांनी यावेळी या महिलांना मिठाईचे वाटप केले. महिलांना शिक्षणाचे महत्त्व सांगून शिक्षित व्हावे असा संदेश दिला. अॅड. बनकर यांनी याप्रसंगी व्यसन मुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याची व आपल्या आजूबाजूला असलेल्या एका तरी व्यक्तीला आपण व्यसनमुक्त होण्यासाठी मदत करू, अशी शपथ त्यांना दिली.

यावेळी येथील महिला सरपंच कविता सुदाम दुडे व सुदाम दुडे हेही उपस्थित होते. कविता दुडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सुदीक्षा फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा सुमन गोपाळे आणि सचिव मुक्ता दरेकर या प्रसंगी उपस्थित होत्या. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व आनंदात पार पडलेल्या या सोहळ्यात कातकरी समाजातील काही महिलांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपस्थित मान्यवरांना कोळवण ग्रामपंचायतीतर्फे कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या. सचिन आक्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
दिवाळीचा हा पहिला दिवस आनंदात संपन्न झाला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: