इतरपरभणीमराठवाडाराज्यलाईफस्टाईलशिक्षणसाहित्य

1000 तास सलग गायनाचा विश्‍वविक्रम होणार, गायकांना सुवर्णसंधी

Spread the love

महाराष्ट्र विश्‍व न्यूज, परभणी – राष्ट्रीय एकात्मतेला समर्पित आणि अवयवदान, बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्टॉप ग्लोबरल वार्मिंग, कैंपस विथ हेलमेट, सेव वॉटर-सेव्ह ट्रीज या ज्वलंत सामाजिक उपक्रमांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विराग मधुमालती व त्यांची टीम सज्ज झाली आहे. प्रत्येक 7 दिवस वरीलपैकी प्रत्येक उपक्रमाला समर्पित केले जातील. सध्याचा जगातील सर्वात मोठा 792 तास कराओके गायनाचा जागतिक विश्‍वविक्रम हा चीनच्या नावे असून तो मोडीत काढून नवीन 1000 तासांचा विश्‍वविक्रम भारताच्या नावे करण्याचा वीराग मधुमालती यांनी संकल्प केला आहे. शेमारू भक्ती स्टुडिओ यांच्या सहकार्याने हा विश्‍वविक्रम करण्यासाठी गायकांची निवड सुरू झाली असून 10 वर्ष ते 70 वर्ष वय असलेले कुणीही गायक कलाकार यात भाग घेवू शकतात.

परभणी येथील आयुष डान्स अ‍ॅकेडमीच्या सौजन्याने दि. 4 नोव्हेंबर 2019 रोजी तापडिया कॉम्प्लेक्स, बालविद्या मंदिर नानलपेठ पोलीस स्टेशनजवळ परभणी येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5.00 वाजेदरम्यान निवड चाचणी आयोजित करण्यात आलील असून इच्छुक गायक कलावंतांनी या ऐतिहासिक संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक व विश्‍वविक्रमी गायमक विराग मधुमालती यांनी केले आहे. विविध कलाकार, विविध संस्कृती व विविध भाषांचा समावेश असलेला हा स्वरांचा महाकुंभ असून त्यात संपूर्ण भातरताील गायक कलाकारांच्या आवाजाची किमया संपूर्ण विश्‍वाला ऐकायला मिळणार आहे. 9 नोव्हेंबरपासून मुंबई येथे या विश्‍वविक्रमाला गवसणी घातली जाणार आहे. शिवाय या ऐतिहासिक कार्यकमा दरम्यान नेत्रदान व अवयवदानाचे इच्छापत्र देखील स्विकारले जाणार आहे. या नवीन विश्‍वविक्रमाने आपल्या देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाईल. शिवाय वरील ज्वलंत सामाजिक उपक्रमांची जनजागृती देखील होईल. विराग मधुमालती यांनी आजवर चारदा जागतिक विश्‍वविक्रम केले असून राष्ट्रीय एकात्मता व नेत्रदान जनजागृतीसाठी समर्पित केले आहे. दिव्यांगांच्या वेदना व भावना अनुभवण्यासाठी विराग ने 100 दिवस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डोळ्यांवर पट्टी बांधून दिव्यांगांचे जीवन व्यतीत केले व त्या दरम्यान जागोजागी अनेक जन प्रबोधनाचे कार्यक्रम घेवून नेत्रदान जनजागृती केली. सुप्रसिध्द पार्श्‍व गायिका साधना सरगम व सुरेश वाडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगिले की गायक कलाकारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे व जास्तीत जास्त गायंकानी यात भाग घ्यावा. बरेचशे पार्श्‍वगायक व सिनेसृष्टीतील कलाकार या दरम्यान उपस्थित राहणार आहेत. तरी ज्या गायक कलाकारांना या संधीचे सोने करायचे असेल त्यांनी कपिल भरणे यांच्याशी 9850749227 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: