इतरकोकणराज्यसंपादकीयसिंधुदुर्ग

वानिवडे -पावणाई गावात कातळ शिल्पे आढळली

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(देवगड-सिंधुदुर्ग) – तालुक्यातील बेटाचे गाव अशी ओळख असलेले वानिवडे गाव सध्या महसुली वानिवडे व पावणाई अशी दोन गावे असलेल्या गावाचे पुरातन प्राचीन मंदिर श्री पावणाई देवी परिसरात फिरत असताना कोल्हापूर येथील डॉ. बाळासाहेब देसाई हे सध्या वानिवडे गावात डॉक्टरी व्यवसाय करतात त्यांना हि कातळ शिल्पे सापडली.

ती मंदिरापासून सुमारे २०० मीटर अंतरावर आहेत या कातळ शिल्पानचा अभ्यास तसेच जतन, संवर्धण होण्याच्या दृष्टीने सिंधुसेवा प्रबोधिनी या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश सरवणकर व श्री देव मांडकरी ग्राम उत्कर्ष मंडळ वानिवडे व ईश्वर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.श्रीविद्या सदाशिव सरवणकर पुरात्तव खात्याशी संपर्क साधून या कातळ शिल्प संवर्धन व अभ्यास व्हावा यासाठी प्रयत्न कारणात आहेत.

तसेच महाराष्ट्र सरकारनेही काही कोटी या कातळ शिल्पाचे संवर्धन ,अभ्यास व पर्यटन या साठी मंजूर केले आहेत त्यासाठी ही सरकार दरबारी पत्रव्यव्हार करणार आहेत तसेच कातळ शिल्पाचे अभ्यासक सुधीर दिसबुड यांच्याशी संपर्क साधणार आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: