इतरकोल्हापूरपश्चिम महाराष्ट्रराज्यसाहित्य

हणबरवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा

बाल गोपाळांनी दारोदारी साकारले नेत्रदिप शिवकालीन गडकोट

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(कोल्हापूर ) – दीपावलीचे औचित्य साधून दिग्दर्शक रामकुमार गोरखनाथ शेंडगे व सिद्धनाथ शेंडगे यांच्या वतीने हणबरवाडी (मसूर) या ठिकाणी भव्य किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक बाल स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

मोठया प्रमाणात भरलेल्या या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी दारोदारी प्रतापगड, रायगड, राजगड, नळदुर्ग, सिंधुदुर्ग, पन्हाळा असे विविध किल्ले उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा दिला. किल्ले स्पर्धेत किल्ला शिवकालीन असावा.

किल्याची माहिती दिशा दर्शक, इतिहासाची माहिती असावी असे नियम व अटी होत्या. स्पर्धकांनी सुरेख असे किल्ले बनवून शिवकालीन गडकोटांना उजाळा दिला.

दिग्दर्शक रामकुमार शेडगे म्हणाले कि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा जिल्हा शिवरायांच्या पराक्रमाची भूमी आहे. महाराष्ट्रातील तसेच साताऱ्यातील गडकोट प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत.

हाच छत्रपतींचा वारसा आपल्या येणाऱ्या पिढीने जपून तो टिकवला पाहिजे. या किल्ले स्पर्धेतून शिवकालीन गडकोटांना उजाळा मिळावा हाच आमचा उद्देश होता. अशा उपक्रमांतून आपल्या इतिहासाला नवसंजीवनी मिळणारी आहे.

भैरवनाथ केसरी तसेच सातारा पोलिसमध्ये कार्यरत असलेले सिद्धनाथ शेडगे म्हणाले कि सध्याच्या युगात लहान मुले मोबाईल गेम आणि टीव्हीच्या जाळ्यात अडकली असताना त्यांना आपल्या शुरविरांची आणि देदीप्यमान इतिहासाची माहिती स्मरणात राहून त्यांनी यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी म्हणून हा आम्ही उपक्रम राबवला होता.

या स्पर्धेत यशराज दबडे, समाधान पवार, श्रेयश कदम, प्रथमेश पवार, वेदांत ढेरे, स्वराज पवार, पार्थ पवार, सोहम शेंडगे, साहिल शेंडगे, आदित्य शेंडगे ,सर्वेश शेंडगे, देवराज शेंडगे अशा अनेक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता.

यावेळी किल्याचे परीक्षण लता शेंडगे, गोरखनाथ शेंडगे, अरुण शेंडगे, गजानन शेंडगे, किशन शेंडगे, विजय फडतरे, अक्षय शेंडगे, विजय शेंडगे आदींनी केले. लवकरच या स्पर्धकांना शाल श्रीफळ, रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून यांचा सन्मान केला केला जाणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: