इतरकोकणरणधुमाळीरत्नागिरीराज्य

शिवसेना नेते आदित्य ठाकरे ३१ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी लांजा व राजापूर दौऱ्यावर !

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – “क्यान” वादळामुळे व अवकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतकऱ्यांचे भात व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान असल्याने कोकणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेना सचिव, शिवसेना लोकसभा गटनेते व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत ह्यांचे नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. दिपकभाई केसरकर व राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजनजी साळवी ह्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस ह्यांचेकडे निवेदनाद्वारे केली होती.

तसेच आमदार राजन साळवी ह्यांनी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्यजी ठाकरे ह्यांची भेट घेऊन देखील कोकणातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.

त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार मा. आदित्यजी ठाकरे ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा व राजापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

ह्या दौऱ्यामध्ये मा. आदित्यजी ठाकरे सकाळी ११ वाजता लांजा तालुक्यातील कुवे येथे व दुपारी १२ वा. ३० मि. वाजता राजापूर तालुक्यातील उपळे व तारळ ह्या गावांना भेट देऊन शेतावर वा बांधावर जाऊन येथील शेतकऱ्यांची भेट घेणार असून वादळामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.

त्यानंतर मा. आदित्यजी ठाकरे महाराष्ट्राचे मा. राज्यपाल ह्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी करणार आहेत. त्यामुळे मा. आदित्यजी ठाकरे ह्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात असून शेतकऱ्यांना ह्या दौऱ्याच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: