इतरनागपूरराज्यविदर्भ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण-पश्चिममधून विजय

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – नागपूर दक्षिण-पश्चिम या मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला आहे. जवळपास २५ हजारांच्या मताधिक्याने फडणवीस यांनी बाजी मारली आहे. देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचं आव्हान होतं.

एकीकडे मुख्यमंत्र्यांचा विजय झाला असला, तरी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काही दिग्गजांना पराभवाचा धक्का लागला आहे. पंकजा मुंडे, राम शिंदे या बड्या मंत्र्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या २८८ जागांचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे. पण जागांच्याबाबतीत भाजप पहिल्या क्रमांकावर, शिवसेना दुसऱ्या, राष्ट्रवादी तिसऱ्या आणि काँग्रेस चौथ्या क्रमांकावर राहील, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: