Uncategorized

विधानसभा निवडणुकीत सर्वात लक्षवेधी ठरलेली कोकणातील कणकवलीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

राज्यभरात युतीत लढणारी भाजपा-शिवसेना कणकवली विधानसभा मतदार संघात मात्र आमनेसामने

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(सिंधुदुर्ग) – विधानसभा निवडणुकीत सर्वात लक्षवेधी ठरलेली कोकणातील कणकवली मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कणकवली मतदारसंघात भाजपाचे नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचे सतीश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. राज्यभरात युतीत लढणारी भाजपा-शिवसेना या मतदारसंघात आमनेसामने असल्याचं चित्र आहे.

कणकवली मतदारसंघात ६० टक्क्यांच्या वर मतदान झालं आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिन्ही जागांवर शिवसेनेचा विजय होणार आहे. तर कणकवलीत जेव्हा मी ४ ऑक्टोबरला फॉर्म भरला त्याच दिवसापासून माझा विजय झाला आहे.

२००४ पासून नारायण राणे जो अंदाज सांगतात तो नेहमी उलट लागतो हे चित्र आहे. माझं जे व्हिजन आहे ते मी लोकांसमोर मांडले आहे. मला संधी द्यायला हवी ती संधी शिवसेनेने दिली आहे. त्यामुळे कणकवलीची जागा शंभर टक्के शिवसेना जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघातून संदेश पारकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून शिवसेना नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. यासाठी खासदार विनायक राऊत यांच्यासह खुद्द शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी त्यांच्या घरी ठाण मांडले होते.

संदेश पारकर यांना शिवसेनेत बड्या पदावर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे अखेर पारकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

एकेकाळचे अत्यंत विश्वासू व कट्टर समर्थक असलेल्या सावंत यांनी प्रथम अपक्ष व त्यानंतर शिवसेनेत जाऊन भाजपाचे उमेदवार तथा नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी कणकवलीत भाजपाचाच उमेदवार विजयी होईल इतकचं नाही तर नितेश राणेंना ७५ टक्के मतदान होईल आणि विरोधक २५ टक्क्यात गुंडाळले जातील असा दावा केला होता. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही कणकवलीची जागा प्रतिष्ठीत केली आहे. या जागा जिंकून आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कणकवलीत सभादेखील घेतली. त्यामुळे कणकवलीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: