Uncategorized

‘राजेशाही’चा अनुभव देणारा ‘राजवाडा’ ग्राहकांच्या भेटीला

श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सच्या 'राजवाडा' लाउंजचे उद्घाटन

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – खास डिझाईन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘राजवाडा’ या नव्या लाउंजचे (दालनाचे) उद्घाटन मंगळवार, दि. २२ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता, गणपती चौक, सिटी पोस्टजवळ, लक्ष्मी रस्ता, पुणे येथे होणार आहे.

सेलिब्रिटी डिझाईनर अर्चना कोचर यांनी डिझाईन केलेले खास डिझाईनर क्लोथ्स आणि त्याला अनुसरून डिझाईनर ज्वेलरी येथे असणार आहे. याशिवाय या दालनातील सोफा, खुर्च्या यासह सर्व वस्तू शुद्ध चांदीच्या असून, ग्राहकांना इथे राजेशाही थाट अनुभवता येणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यासाठी सेलिब्रिटी डिझाईनर अर्चना कोचर, वसंत नगरकर, प्रसाद नगरकर आदी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर अर्चना कोचर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

तरी या उद्घाटन सोहळ्यासाठी व वार्तालापासाठी आपल्या लोकप्रिय दैनिकाचा, वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी व छायाचित्रकार पाठवावा, ही विनंती.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: