रणधुमाळीराज्यUncategorized

औरंगाबाद मध्यचा कोण होणार आमदार ?

Spread the love

औरंगाबाद  –  औरंगाबाद मध्यचे आमदार राहिलेले इम्तियाज जलील आता खासदार झालेत आता त्यांची जागा कोण घेणार या कडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. गेल्या काही काळात इम्तियाज जलील यांच्या चुकीच्या धोरणांमुळे एमआयएम मध्ये अंतर्गत वाद निर्माण झालेले आहेत याचे  उदाहरण ओवैसी यांच्या सभे वेळेस दिसले होते.

शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जयस्वाल व वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ तसेच एमआयएम  कडून जलील यांच्या गोटातील नसीर सिद्धिकी यांच्यात लढत होताना दिसत आहे परंतु विधान परिषदेच्या निवडणुकी वेळेस शिवसेनेच्या अंबादास दानवे यांना मदत केल्यामुळे मुस्लिम समाजात एमआयएम विरोधात नाराजी असल्याचे दिसून येते. मुस्लिम समुदायाचा  राजकीय कल पाहता वंचित बहुजन आघाडीचे पारडे जड दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: