पश्चिम महाराष्ट्रमराठवाडा

वंचित बहुजन आघाडी मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटवणार

Spread the love

मुंबई –  महाराष्ट्र भौगोलिक सलगतेनुसार मुंबई-कोंकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भ असा विभागाला गेला आहे. यापैकी मराठवाड्याचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालला आहे. मराठवाड्यात ११ मोठे, ७५ मध्यम आणि ७४९ लघु प्रकल्प आहेत. धरणं प्रकल्प असूनही मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न बिकट होण्याला जसा निसर्ग जबाबदार आहे तेवढच महाराष्ट्रात आजवर आलेली सरकारं सुद्धा जबाबदार आहेत.

नाशिक आणि नगर जिल्ह्याचा मोठा विरोध डावलून नाशिकच्या गंगापूर धरणातून सोडलेल्या ८.९९ टीएमसी पाण्यापैकी निव्वळ अर्धे म्हणजे ४. ६६ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहचते. जायकवाडी पर्यंत पोहचणारे अर्धे पाणी कालव्यांच्या अभावी, अस्तित्वात असलेल्या कालव्यांच्या देखभालीच्या अभावी जमिनीत झिरपून जाते. दुसरीकडे कोयना आणि टाटाच्या ईतर सहा धरणातील पाणी वीज निर्मितीनंतर समुद्रात सोडले जाते.

आज वीजनिर्मितीसाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणुऊर्जेचे पर्याय उपलब्ध असताना जवळ्पास हे १५० टीएमसी वाया घालवून मराठवाड्यासह सोलापूरला तहानलेला ठेवण्यात काय अर्थ आहे? अश्या परिस्थितीत वंचित बहुजन आघडीचा भूमिका ही आहे की धरणांच्या पाण्यावर होणारी वीजनिर्मिती टप्प्याटप्प्याने कमी करून त्याऐवजी पर्यायी वीजतंत्रज्ञानाचा वापर करून वीजनिर्मिती करावी व हे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाडा व सोलापुराकडे वळऊन तिथल्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटववा.

राज्यात सध्या विजेची कमतरता नसून अतिरिक्त वीज उपलब्धता सरासरी ४.६% सरप्लस आहे. त्यामुळे अश्या प्रकारचा प्रयत्न करून महाराष्ट्राला जवळपास १५० टीएमसी पाणी अधिकचे मिळू शकेल आणि त्यासाठी वेगळी गुंतवणूक करण्याची, नवे प्रकल्प बांधण्याची गरज नाही. यातून मराठवाड्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. शेतकरी अधिक पीक-आंतरपीक घेऊन या विभागाच्या समृद्धीच्या भर पडेल. लघु उद्योगांना चालना मिळून मराठवाड्यात समृद्धी निर्माण होईल.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: