इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

‘इंडस्ट्री ४.0 नंतरचे जीवन ‘ या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद

डॉ पी ए इनामदार फौंडेशन’ तर्फे १९ ऑक्टोबर रोजी आझम कॅम्पस येथे आयोजन

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(पुणे) – ‘इंडस्ट्री ४.0 नंतरचे जीवन‘(एज्युकेशन ,वर्क अँड लाईफ बियॉंड इंडस्ट्री ४.0) या विषयावर डॉ पी ए इनामदार फौंडेशन तर्फे १९ ऑक्टोबर रोजी आझम कॅम्पस मैदान (पुणे कॅम्प)येथे राष्ट्रीय परिसंवाद आयोजन करण्यात आला आहे.

महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,संयोजक डॉ आर गनेसन यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.हा परिसंवाद आझम कॅम्पस च्या मैदानावर सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे.

संजय सहाय (अतिरिक्त पोलीस महासंचालक ,कर्नाटक),श्रीनिवास नारायण (कार्यकारी उपाध्यक्ष ,नोउस इन्फोसिस्टीम,वरदराजू जनार्दनन(इन्होवेशन लॅब्स),विन्नी जोहरी (संचालक ,एज्युकेशन एडव्होकसी, मायक्रोसॉफ्ट ) हे मान्यवर या परिसंवादात सहभागी होणार आहेत .

इंडस्ट्री ४.0 या क्रांतिकारक टप्प्यावर सर्वांचेच आयुष्य बदलून जाण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.या बदलांचा शैक्षणिक ,सामाजिक ,औद्योगिक,आर्थिक बदलांचा वेध घेवून त्यासाठी सज्जता करण्याचे नियोजन प्रत्येकाला करता यावे ,अशी चर्चा या परिसंवादात होणार आहे ,असे डॉ पी ए इनामदार यांनी सांगितले .

शैक्षणिक ,सामाजिक ,औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांना ,विद्यार्थी,शिक्षकांना यात निमंत्रित करण्यात आले आहे.सर्वाना विनामुल्य प्रवेश आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: