इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यविज्ञान तंत्रज्ञानसाहित्य

आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

आयुर्वेदातील संशोधनावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद दि. १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(पुणे) – डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे दि. १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी “आयुर्वेदातील संशोधन” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद व आय एम ए व्ही एफ नेदरलँड यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या देशातील आरोग्यातज्ञ् , संशोधक, विद्यार्थी असे एकूण ४०० पैक्षा अधिक सहभागार्थी असतील.

“आयुर्वेदातील संशोधनाचा प्रचार व प्रसार व्हावा, आयुर्वेदातील नवनवीन संशोधन करण्यास गती प्राप्त व्हावी तसेच या क्षेत्रात नवपिढीचे योगदान वाढावे आणि गुणवत्तापूर्ण संशोधन कार्य घडावे” या प्रमुख उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेचा उदघाटन कार्यक्रम दि १९ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११:३० वा मा श्री डॉ. के. एस. धीमान (डायरेक्टर जनरल, सी सी आर ए एस, नवी दिल्ली ) यांच्या हस्ते होणार आहे.

मा. डॉ.पी.डी पाटील (कुलपती, डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ) मा.सौ. भाग्यश्रीताई पाटील (उपाध्यक्षा डॉ. डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटी ) मा. सौ. डॉ. स्मिता जाधव (विश्वस्थ व कार्यकारी संचालक, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ ) मा. डॉ. एन. जे.पवार (कुलगुरू, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ) मा. डॉ ए.एन. सूर्यकार (कुलसचिव, डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ) मा.डॉ . जोस रुगे (शुद्ध धर्म मंडळ, ब्राझील) मा. डॉ. सुभाष रानडे (अध्यक्ष – इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) मा. डॉ सुनंदा रानडे(उपाध्यक्ष, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) मा डॉ गुणवंत येवला (प्राचार्य, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय ) मा. डॉ बी.पी पांडे (सल्लागार, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय) मा.डॉ. दिगंबर दिपंकर (आयोजन सचिव, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय) मा. डॉ मंदार बेडेकर यांच्या उपस्थितीत परिषद संपन्न होणार आहे.

या दोन दिवसीय परिषदेत विविध विषयांवर देश विदेशातील तज्ञ् डॉक्टर्स परिषदेला संबोधित करतील यामध्ये डॉ. के. एस. धिमान (सी सी आर ए एस, नवी दिल्ली ) डॉ श्रीराम सावरीकर नवीदिल्ली, मा. डॉ .जोस रुगे, ब्राझील, डॉ एम एस बघेल व डॉ अनुप ठकार , जामनगर, डॉ रमेश भोंडे , पुणे, डॉ. एन. श्रीकांत, नवीदिल्ल्ली, डॉ. सुप्रिया भालेराव, रणजित पुराणिक (धूतपापेश्वर) हे प्रमुख वक्ते उपस्थित असतील.

या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विविध विषयांवर शिक्षणतज्ञ् व्यावसायिक डॉक्टर्स, पद्युत्तर पदवी चे विद्यार्थी यांनी आयुर्वेदात केलेल्या संशोधनावर पेपर सादरीकर व भिंतीपत्रक सादरीकरण करणार आहेत.

पहिल्या दिवसाच्या सांगतेला परदेशातून आलेल्या सहभागार्थी साठी भारतीय संस्कृती दर्शन पर सांस्कृतिक कायक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही आंतरराष्ट्रीय परिषद डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: