इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेरणधुमाळीराज्य

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत युवक क्रांती दलाची भुमिका जाहीर

९ उमेदवारांना युक्रांदचा पाठिंबा

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(पुणे) – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करू शकेल, अशा उमेदवाराना युवक क्रांती दलाचा पाठिंबा राहील,अशी भूमिका अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी आणि सहकाऱ्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत जाहीर केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे 16 ऑक्टोबर रोजी ही पत्रकार परिषद झाली. सुरेश खोपडे, अन्वर राजन, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर , सचिन पांडूळे आदी उपस्थित होते.

डॉ सप्तर्षी म्हणाले,”युक्रांद च्या बैठकीत पाठिंब्या चा निर्णय झाला. तो पत्रकार परिषदेत जाहीर करीत आहोत.देशात दहशतीचे वातावरण आहे. भाजप बाहेरचे आयात उमेदवार आणून राजकारण करू पाहत आहे. केवळ प्रतिकांचे, भावनांचे राजकारण करून मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. भाजपा विरोधी मते एकत्रित व्हावीत असा आमचा प्रयत्न आहेत”.

भ्रष्टाचार, आयात उमेदवार असे गैरप्रकार न आवडणाऱ्या संघ, भाजपच्या काही मंडळींना लॉलीपॉप दाखवण्यासाठी सावरकरांना भारतरत्न देण्याचे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे, असे डॉ. सप्तर्षी यांनी याबाबतच्या प्रश्नाला उत्तरादाखल सांगीतले.

बुधवार , दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी १२ वाजता युवक क्रांती दलाच्या पदाधिका-यांची बैठक पुण्यात पार पडली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करू शकेल, अशा उमेदवाराला युक्रांद समर्थन देईल, असा ठराव मंजूर करण्यात आला.

युक्रांदचे संस्थापक – अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या युक्रांद पदाधिकारी बैठकीत राज्य कार्यवाह संदीप बर्वे, राज्य संघटक जांबुवंत मनोहर, राज्य सहकार्यवाह अप्पा अनारसे, पुणे शहराध्यक्ष सचिन पांडूळे, पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे, पुणे शहर संघटक ऋतूजा पुकळे, अन्वर राजन, मुख्तार मणियार आणि इतर युक्रांदीय उपस्थित होते, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

राज्यातील विधानसभा मतदारसंघांपैकी युक्रांदचा पाठिंबा पुढील उमेदवारांना जाहीर करण्यात आला. :- किशोर शिंदे – कोथरूड ( पुणे ) ,रोहीत पवार : कर्जत – जामखेड ( अहमदनगर ) सचिन दोडके – खडकवासला ( पुणे ) , शिवकुमार लाड – वडाळा ( मुंबई ) . युवराज मोहीते – गोरेगाव ( मुंबई ) , विजयसिंह पंडीत – गेवराई ( बीड ) , राहुल कलाटे – चिंचवड ( पुणे ) ,बच्चू कडू – अचलपूर ( अमरावती ), अरविंद शिंदे (कसबा)यांना युक्रांद ने पाठिंबा जाहीर केला

सुरेश खोपडे म्हणाले,”देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा भ्रमनिरास केला. त्यांनी सत्तेवर टिकून राहणे इतकेच उद्दीष्ट समोर ठेवले. पुरोगामी विचारांचा , व्यक्तींचा खून पाडला जात आहे. म्हणून हे सरकार गेले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.”

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: