इतरउत्तर महाराष्ट्रनाशिकरणधुमाळीराज्य

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नाशिक मध्ये ‘वोट कर, नाशिक कर’ अभियान

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (नाशिक) – महाराष्ट्र सार्वत्रिक विधान सभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारी मध्ये वाढ व्हावी या करीता मा.नाशिक जिल्हा अधिकारी श्री.सुरज मांढरे यांच्या संकल्पनेतील वोट कर नाशिक कर या संकल्पनेतुन आज नाशिकला दिवाळी निमित्त्य खरेदी करण्यासाठी आलेले नाशिकर जनता व आठवडे बाजारातील जनतेला मतदान करण्या संदर्भात नाशिक मधील संस्था व संघटनांनी जनतेमध्ये जाऊन मतदान हा भारतीय राज्य घटनेने दिलेला अमुल्य असा अधिकार नसुन ते आपले आद्य कर्तव्य आहे हे पटवुन दिले.

मतदान करणे म्हणजे लोकशाही जिवंत ठेवणेचे प्रतिकच आहे. आम्ही नाशिककर मतदान करणारच अशी शपथ देखील याप्रसंगी घेण्यात आली. या प्रसंगी नव-नाथपंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्था,अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच,महर्षी चित्रपट संस्था,सक्षम सोशल फाऊडेशन,रुक्मिणी चँरिटेबल ट्रस्ट,आँल इंडिया अँन्टी करप्शन बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

या मा.श्री.निशिकांत पगारे, मा.श्री.सुनिल परदेशी, मा.श्री.रोहित कानडे, मा.श्री.प्रकाश बर्वे,मा.श्री.सोमनाथ मुठाळ,सौ.वैशाली चव्हाण, सौ.स्नेहल ठाकरे, सौ.संजना पगार यांनी जनजाग्रुती व प्रबोधन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: