इतरविज्ञान तंत्रज्ञानसंपादकीय

तब्बल 64MP कॅमेरा, शाओमीचा Redmi Note 8 Pro भारतात लाँच

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – शाओमीने आपला बहुप्रतिक्षित नवा स्मार्टफोन रेडमी नोट 8 प्रो (Redmi Note 8 Pro) भारतीय बाजारात लाँच केला आहे. यामध्ये मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 64MP क्षमतेचा आहे. 64MP क्षमतेचा कॅमेरा असलेला शाओमीचा हा पहिलाच फोन आहे. हा स्मार्टफोन म्हणजे Redmi Note 7 Pro स्मार्टफोनची पुढील आवृत्ती आहे.

Redmi Note 8 Pro फीचर्स –
या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला 64MP क्षमतेचा सॅमसंग ISOCELL Bright GW1 कॅमेरा असून अन्य तीन कॅमेरे 8MP+2MP+2MP क्षमतेचे आहेत. याशिवाय फोनमध्ये सेल्फीसाठी 20MP क्षमतेचा कॅमेराही आहे. स्लो-मोशन व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फीचर यामध्ये आहे. 4500 mAh क्षमतेची पावरफुल बॅटरी यात देण्यात आली आहे. गामा ग्रीन, हेलो व्हाइट आणि शॅडो ब्लॅक अशा तीन कलर्समध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे.

यात 6.53 इंचाचा डिस्प्ले असून यात 3D कर्व्ह्ड गोरिला ग्लासचा ५ पॅनलचा वापर करण्यात आला आहे. 6GB रॅम + 64GB स्टोरेज, 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज अशा तीन विविध व्हेरिअंट्समध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. मीडियाटेक हेलियो G90T chipset चा सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन MIUI 10 Android 9 Pi वर कार्यरत असेल.

उत्तम गेमिंग अनुभवासाठी यामध्ये लिक्विड कूलिंग सपोर्ट आहे, याद्वारे गेम खेळताना कोणत्याही समस्येशिवाय दर्जेदार अनुभव मिळेल असा कंपनीचा दावा आहे. अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता या फोनच्या विक्रीसाठी सेल आयोजित करण्यात आला आहे.

किंमत –

6GB रॅम + 64GB स्टोरेज – १४ हजार ९९९ रुपये,
6GB RAM + 128GB स्टोरेज – १५ हजार ९९९ रुपये
8GB RAM + 128GB स्टोरेज – १७ हजार ९९९ रुपये

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: