इतरऔरंगाबादमराठवाडारणधुमाळीराज्य

संजय सिरसाट पराभावच्या छायेत,शिवसैनिकच करताय बंडखोराचा प्रचार

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(औरंगाबाद ) – पाच वर्षांत एकदाही मतदारांच्या भेट न घेणाऱ्या पश्चिम मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार यांच्या विरोधात शिवसैनिकच प्रचार करीत आहे. दहा वर्षांत मतदारसंघातील रखडलेले विकास कामांमूळे नाराजी आहे. त्याच नाराजीला सिरसाट यांना सामोरे जावे लागत आहे. सिरसाट यांनी कार्यकर्ते न सांभळल्यामूळे हेच कार्यकर्ते आता सिरसाटाच्या विरोधात थेट प्रचार करीत आहेत.

पश्चिम मतदारसंघात सामिल झालेल्या सातारा-देवळाई भागात आजही पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासह बीड बायपास वरील कामेही झाले नाही. चांगले रस्ते, पाणी हाच महापालिकेत असूनही सूटेलेला नाही. यामूळे येथील मतदार नाराज आहे.

यामूळे संजय सिरसाट या भागात प्रचार फेरी काढत नाही. ज्या समाजातून संजय सिरसाट पुढे आले आहेत. त्या समाजाचे एकही मत सिरसाट यांना पडत नाही. यावेळी एमआयएमचे अरुण बोर्डे आणि भाजपचे बंडखोर राजू शिंदे हे पश्चिम मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. हे दोघेही संजय सिरसाट यांच्या हक्काचे मतदार आपल्याकडे वळत आहेत.

पश्चिम मतदारसंघात वाळुज एमआयडीसीचा भाग येतो. या भागातील व्यापारी,उद्योजकांचा विकास झालेला नाही. यासह राजकीय नेत्यांकडून या उद्योजकांना दरवेळी त्रास देण्यात येतो. यामूळे गेल्या दहा वर्षांतही एमआयडीसीत विकास झाला नाही.

नवीन उद्योग आणला नाही. संजय सिरसाट यांनीही काम केले नसल्यामूळे वाळुज परिसरातील सर्वच शिवसैनिकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. एवढेच नव्हे तर तेच शिवसैनिक संजय सिरसाट यांना पाडण्यासाठी काम करीत आहेत.एकही नगरसेवक सोबत नाही.

पश्चिम मतदारसंघात संजय सिरसाट यांच्या सोबत असलेले सर्वच भाजप इतर पक्षात गेले आहे.एवढेच नव्हे त्यांच्या जवळचे काम करणाऱ्यांनीही सिरसाट यांना सोडून इतर पक्षात गेले हे लोक नाराज असल्यामूळे सिरसाट यांना प्रचारसाठी नव्या चेहऱ्यांना बोलविण्यात यावे लागत आहे. पश्चिम मतदारसंघातून सुशिक्षित मतदारांची संख्या मोठी आहे. त्यांनी दहा वर्षे सिरसाट यांच्या पाठिशी उभे राहीले मात्र यावेळी ते बंडखोर उमेदवारांच्या पाठिशी उभे राहणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: