इतरगडचिरोलीरणधुमाळीराज्यविदर्भ

चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विमानाच इंधन निर्माण करणार केंद्र बनविणार- नामदार नितीन गडकरी

नागभीड येथील जाहीर सभा,बेरोजगारांना उद्योग उभारणार

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(चिमूर गडचिरोली) – सिमेंट रस्ते पूर्ण करण्याचे श्रेय हे लोकप्रतिनिधी ना नसून त्याचे श्रेय जनतेला असून भाजप वाढण्यासाठी सुद्धा जुन्या निष्ठवंत जनसंघ भाजप कार्यकर्त्यांना आहे गरिबी हटाव च्या घोषणा कांग्रेस काळात झाल्या परंतु समाजातील घटकांची झाली नसून गरिबी हटली ती कांग्रेस राजकीय पुढाऱ्यांची असे सांगत केंद्रीयमंत्री नामदार नितीन गडकरी म्हणाले की जे 60 वर्षात कामे झाली नाही ती कामे 5 वर्षात पूर्ण भाजप सरकारने पूर्ण केलीत .

40 लाख हेकटर जमीन पाण्याखाली येणार आहेत .नवीन नद्या पुनर्जीवित केल्या जलसंवर्धन कामे केलीत .शेती क्षेत्रात मूलगामी परिवर्तन केले पाहिजे . शेतकऱ्यांना इंधन पुरवू शकतो हे सिद्ध झाले आहे .सीएनजीवर बसेस सुरू झाल्या आहेत . शेतकऱ्यांचे जीवन कसे सुसजय होईल याकडे लक्ष घातले आहे . सिंचन विहिरी वीज पुरवठा साठी जोडण्या दिल्या. दुधाचे प्रकल्प। वाढवून दुधाला भाव मिळाला आहे .

संत्र्याची बर्फी ची मागणी जगात वाढली असल्याने शेतकऱ्यांचे हित जोपासत आहे 11 कोटी बेरोजगारांना काम मिळणार आहे .अशक्य गोष्टी शक्य करण्याची जिद्द आहे हे दिन दयाल उपाध्याय यांनी सांगितले आहे .आज 65 टक्के जनता ग्रामीण भागात आहे .कुंभार समाजाला खिलल्ड बनविण्याची योजना आणली .गडचिरोली ला अगरबत्ती बनविण्याचा हब बनविण्याचा विचार आहे .एक कोटी माणूस माणूस खिचण्याचा काम करीत होते हे शोषण होत होते तेव्हा शोषणा पासून मुक्त करण्यासाठी 40 लाख ईरिकशा आणले देश व राज्य बदलत आहे . जनतेच्या आशीर्वादाने चिमूर विधानसभा क्षेत्र बंटी भांगडीया मुळे बदलत आहे .

सामाजिक क्षमतेवर देश बदवीत आहे . विधानसभा क्षेत्रातील 9 उमेदवारांची जमानत करून 50 हजार चे वर मतांनी विजयी करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांनी केले .

भाजप शिवसेना रिपाई आ रासप महायुतीचे उमेदवार बंटीभाऊ भांगडीया यांच्या नागभीड येथील जाहीर सभेत खासदार अशोक नेते , माजी आमदार मितेशजी भांगडीया उमेदवार तथा उमेदवार बंटीभाऊ भांगडीया ,वसंत वारजूकर ,राजू पाटील झाडे ,बंडूभाऊ नाकाडे, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख धर्मसिह वर्मा, डॉ दीपक यावले, टीमु बलदवा, देविदास गिरडे ,नगराध्यक्ष प्रा उमाजी हिरे, प्रकाश वाकडे, अड नवयुग कामडी, बकाराम मालोदे ,जीप सदस्य मनोज मामीडवार ,जीप सदस्य रेखा कारेकर दिलीप कारेकर, अड दिगंबर गुरपुडे ,इदूताई अंबोरकर ,रमेश बोरकर ,आदी उपस्थित होते.

खासदार अशोक नेते यांनी केंद्राच्या विविध योजना ची माहिती सांगतली.संचालन व अजहर शेख विवेक कापसे यांनी केले.
जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी नागभीड तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम,आवेश पठाण ,सचिन आकुलवार, गणेश तरवेकर ,अजहर शेख ,संजय खाटीक ,मनिष नाईक ,संतोष रडके ,राजू पिसे ,आनंद भरडकर ,आरिफ मिर्झा, विनय शेंडे, मनोज कोहाड, नितुताई येर्ने ,रागिणी गुरपुडे आदींनी परिश्रम घेतले.

भाजप महायुतीचे उमेदवार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की आपल्या आशीर्वादाने निवडून दिल्या होता तेव्हा पाच वर्षात सेवा करीत विकास कामे केली .पक्षाने पुन्हा संधी दिली असताना विश्वास टाकला असताना यापुढे ही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही याची ग्वाही देतो. चिमूर विधानसभा क्षेत्राच्या निवडणूकीत 10 उमेदवार असताना मी एकटा तर इतर 9 उमेदवार एकत्र येऊन विरोध करीत असले तरी जनतेचा आशीर्वाद असल्याने पक्षाने पुन्हा संधी दिली .

कांग्रेसचा उमेदवार भाजप आमदाराने काय केले असा प्रश्न करीत आहे त्यांचे खंडन करीत ते विरोधक 25 वर्षा पासून सत्तेत होते तेव्हा त्यांना प्रश्न सोडविता आले नाही .गोषीखुर्द शिवणाला प्रश्न नामदार नितीनजी गडकरी नी शब्द दिला होता. आज शब्द पूर्ण करीत 40 गावांना पाणी मिळत आहे . गोषीखुर्द च पाणी घोडाझरी तलावात आणून सोडण्याचे काम केले असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था पूर्ण केली .

राष्ट्रीय मार्गाचे काम व अनेक रस्त्याचे काम पूर्ण केले .मुख्यमंत्री सडक योजनेतून 300 रस्ते पूर्ण केलीत . माना समाजाची जात पडताळणी चे काम सुद्धा केले. विरोधी पक्षावर सडकून समाचार घेत 60 महिन्यात जनतेला न्याय देण्याचे काम केले असून भाजप सरकार पुन्हा निवडून आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

दरम्यान कांग्रेस नागभीड नप नगरसेवक शिशिर वानखेडे,पस चिमूर माजी सभापती राजू झाडे तर माना समाजाचे युवा नेते अरुण चौधरी यांनी नामदार नितीनजी गडकरी खासदार अशोक नेते माजी आमदार मितेशजी भांगडीया यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: