इतरगुन्हेविश्वपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

बंडगार्डन पोलिसांनी खुन करणाऱ्या म्होरक्‍यासह पाच जणांना केले अटक

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(पुणे) – पुर्व वैमनस्यातून एका तरुणाच्या डोक्‍यात धारदार शस्त्र घालून त्याचा खुन करण्यात आला होता. ही घटना बुधवारी मध्यरात्री दिड वाजता ताडीवाला रोड झोपडपट्टीमध्ये घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी म्होरक्‍यास तासाभरात अटक केली. तर त्याच्या साथीदारांनाही दोन पथके तयार करुन जेरबंद करण्यात आले.

अतिष आनंदा वानखेडे (वय 23) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अतिषचा भाऊ सतीश आनंदा वानखेडे (वय 23, रा. ताडीवाला रोड झोपडपट्टी) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याच्या खुन प्रकरणी आकाश गायकवाड(रा.ताडीवाला रस्ता) यास बंडगार्डन पोलिसांनी तासाभरात अटक केली. चौकशीत त्याने त्याच्या चार साथीदारांसह खुन केल्याची माहिती दिली. त्यानूसार दोन पथके तयार करुन त्याच्या चारही साथीदारांना अटक करण्यात आली.

फिर्यादीचा भाऊ अतिश वानखेडे व आरोपी आकाश गायकवाड हे ताडीवाला रोड झोपडपट्टीमध्ये राहतात. अतिष व आरोपी यांची 26 जुलै रोजी किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती. त्यामध्ये अतिषविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर अतिष हा खडकी येथे त्याच्या नातेवाईकांकडे राहण्यास गेला होता. तो अधून मधून ताडीवाला रोड झोपडपट्टीत राहणाऱ्या त्याच्या बहिण व नातेवाईकांना भेटण्यासाठी येत होता.

बुधवारी रात्री तो झोपडपट्टीमधील राजगुरू चौकामध्ये आला. त्यावेळी आरोपी व त्यांच्या साथीदारांनी पुन्हा जुन्या भांडणाच्या कारणावरुन अतिषसमवेत भांडणे केली. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याजवळ असलेली लोखंडी पार अतिषच्या डोक्‍यात घातली. त्यानंतर त्यांनी तेथून पलायन केले. दरम्यान, अतिषचे कुटुंबीय व रहीवाशांनी त्यास उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यु झाला.

गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस कर्मचारी कैलास डुकरे व अय्याज दड्डीकर यांना सोबत घेऊन निखील जाधव यांनी ताडीवाला रस्त्याचा नदी किनारा पिंजून काढला. त्यावेळी त्यांना भिंती लगत आकाश गायकवाड दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्याने सांगितलेल्या साथीदारांना पकडण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे व पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रुपेश पिसाळ, किरण तळेकर तसेच सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, पोलीस कर्मचारी फिरोज शेख, मोरे, सानप याचे एक पथक अशी दोन पथके तयार करण्यात आली. दोन्ही पथकांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: