Uncategorized

वंचित बहुजन आघाडी मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सभेचे आयोजन करण्याच्या तयारीत

Spread the love

मुंबई –  वंचित बहुजन आघाडी कडून राज्यात विधानसाभेच्या जवळपास सर्व जागा लढवत आहे, सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी वंचित बहुजन आघाडीचा धसका घेतलेला आहे व यातच आता मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या सभा जाहीर होताच वंचित बहुजन आघाडी जोरदार शक्ती प्रदर्शन करत सर्वच राजकीय पक्षांना इशारा देण्याच्या तयारीत आहे.

या सभेच्या निमित्ताने सुजात आंबेडकर यांनी हि  सभा सध्याच्या राजकारणाची दशा आणी दिशा बदलण्यासाठी महत्वाची असेल तसेच लोकसभे मध्ये आपण ज्या प्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे वादळ उठवले त्याच प्रमाणे आपल्याला विधानसभे मध्ये कामगिरी करायची आहे  असे सांगत लाखोच्या संख्याने उपस्थित रहाण्याचे आव्हान केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: