इतररणधुमाळीराज्य

शिवसेनेचा स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (दि. 12 रोजी ) शिवसेनेचा स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध▪ या वचननाम्यावर बारकोडही प्रसिद्ध, हा बारकोड स्कॅन केल्यावर तुमच्या मोबाईलवरही हा वचननामा तुम्हाला वाचता येऊ शकणार

Spread the love

वचननाम्यात प्रमुख वचनं अशी:-

1. आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार

2.राज्यातील 15 लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी देणार

3. तालुका स्तरावर गाव ते शाळा / महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी 2,500 विशेष बसची सेवा सुरू करणार

4. शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रु. 10,000 प्रतीवर्षी जमा करणार

5. 300 युनिट पर्यंत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर 30 टक्क्यांनी कमी करणार

6. राज्यातील सर्व खेड्यांतील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण आखणार

7. एक रुपयात आरोग्य चाचणी सुविधा देण्यासाठी राज्यभरात ‘1 रुपी क्लिनिक’ सुरु करणार

8. निराधार पेन्शन योजने अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार

9. दहा रुपयांत सकस जेवणाची थाळी

10. राज्यातील सर्व गावांमधील पारंपारिक धार्मिक स्थळांचे सामाजिक महत्व लक्षात घेऊन दुरूस्ती व देखभालीसाठी अनुदान देणार

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: