Uncategorized

प्रकाश आंबेडकरांची अक्कलकोटमध्ये जाहीर सभा वंचितचे सर्व नेते एकत्र, सर्वात मोठी रॅली होण्याची शक्यता

Spread the love

सोलापूर – अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धर्मराज राठोड हे बंजारा समाजाचे उमेदवार असल्यामुळे याठिकाणी संपूर्ण भटके – विमुक्त समाज एकवटल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडीने या भागात २७ हजार मतदान घेतले होते. बंजारा समाजाची ६० हजार मते तसेच इतर सर्व समाजाची मते मिळून एकगठ्ठा दीड लाख मतदान धर्मराज राठोड यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.

विरोधकांना काही तांड्यामध्ये प्रवेशबंदी करण्यात आली असून, काही दलित वस्त्यांवर विरोधकांना एकही कार्यकर्ता प्रचारासाठी मिळेना
अशी अवस्था आहे. यातच अमित शहा यांची अक्कलकोट येथे झालेली सभा फ्लॉप ठरली. यांच्या सभेसाठी विविध भागांमध्ये लोकांसाठी
सोडलेल्या गाड्यांमध्येही लोक बसण्यास तयार नव्हते. यामुळे या गाड्यांना रिकामे परतावे लागले. यामुळे हे चित्र पाहता वंचितांमध्ये
प्रचंड एकी पहायला मिळत आहे. यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे येथे सट्टाबाजार होण्याची शक्यता असल्यामुळे
प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अक्कलकोटमध्ये अनेक निवडणुकांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी आहे. यामुळे यावेळी सुद्धा कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागू नये म्हणून वेगवेगळ्या स्तरांवर प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

अक्कलकोट मतदारसंघामध्ये बीजेपी व काँग्रेस पेक्षा जास्त वंचित आघाडीचे मतदान असल्यामुळे धर्मराज राठोड यांचे वेगवेगळ्या
भागांत उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे. महिलांसह तरुण, अबालवृद्ध यांनी मोठ्या प्रमाणात प्रचारात सहभाग घेतला असून,
अनेक तांड्यांमध्ये ‘आम्ही धर्मराज राठोड’ असे बोर्ड लावून येथे कुणीही प्रवेश करु नये असे लिहिल्याचे पहायला मिळत आहे. निवडणुकीत उमेदवाराचा एवढा प्रभाव असण्याचे ही पहिलीच वेळ पहायला मिळत आहे. यामुळे सर्व प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: