पश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईरणधुमाळीराज्यविदर्भसामाजिक

वंचित बहुजन आघाडीला ऑल इंडिया ऊलमा बोर्डाचा पाठिंबा

Spread the love

 

पुणे प्रतिनिधी –  वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली या बैठकीस  वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार आणि ऑल इंडिया उलमा बोर्डाचे पदाधिकारी उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीने इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत सर्वात जास्त पंचवीस मुस्लिम बांधवांना उमेदवारी देऊन त्यांना खऱ्या अर्थाने भागीदार केले आहे. या सर्व मुस्लिम उमेदवारांना शिवाय वंचितच्या इतर उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा असल्याचे ऑल इंडिया उलमा बोर्डाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नायाब अन्सारी यांनी सांगितले.

उलमाने राजकीय मैदानात येताच वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला आहे. आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही परिश्रम घेऊ. यावेळी मंचावर वंचित बहुजन प्रमुख प्रकाश आंबेडकर, ऑल इंडिया उलमा बोर्डाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मौलवी उस्मान रहेमान शेख आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहम्मद शहाबुद्दीन जावेद सौदागर उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांनी जिंकण्यासाठीच प्रचार करावा, विजय आपला नक्की आहे, आपण सत्तेत निर्णायक भूमिका घेऊ असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: