इतरक्रीडा

रोहितचा विश्वविक्रम

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – हिटमॅन रोहित शर्माचा धावांचा पाऊस पाडण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. सलामीवीर म्हणून आपल्या पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावांत शतक झळकवणारा रोहित जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

पहिल्या डावामध्ये रोहित व मयांक यांनी त्रिशतकी भागीदारी करत 176 धावांची खेळी केली तर दुसऱ्या डावामध्ये 127 धावांची खेळी करून हा विक्रम आपल्या नावावर केला.

दोन्ही डावांमध्ये 13 षटकार मारून रोहितने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या 3 प्रकारामध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.

*षटकारांवर षटकार :

▪ रोहितने 2013 मध्ये खेळल्या गेलेल्या एका एकदिवसीय सामन्यात 16 षटकार ठोकले होते.

▪ रोहितने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना टी-20 सामन्यात एकूण 10 षटकार ठोकले होते.

▪ सध्या चालू असलेल्या द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आतापर्यंत 13 षटकार ठोकले आहेत.

▪ या तीनही प्रकारच्या एका-एका सामन्यात सर्वांत जास्त षटकार ठोकणार तो एकमेव खेळाडू ठरला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: