क्रीडा

अजिंक्य रहाणेला कन्यारत्न

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने मुलीला जन्म दिला आहे. अजिंक्य व राधिका बालपणीपासून मित्र होते व त्यांनी 26 नोव्हेंबर २०१४ मुंबईत लग्न केले होते. यावर्षी जून मध्ये आपण बाबा होणार असल्याचं अजिंक्यने म्हटले होते.

बाप झाल्याची बातमी समजली असली तरी अजिंक्य सध्या द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यासाठी विशाखापट्टणम येथे आहे. भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने ट्विटरवरून हि माहिती देत अजिंक्यला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, भारतीय क्रिकेटपटूंमध्ये धोनी, हरभजन सिंग, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि हनुमा विहारी या खेळाडूंनादेखील यापूर्वी कन्यारत्न प्राप्त झालेले आहे. त्यात आता अजिंक्यचाही समावेश झाला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: