इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसाहित्य

गांधीजींच्या रक्षा पात्राच्या चोरीचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे निषेध

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – मध्यप्रदेशातील रीवा या शहरामध्ये मध्ये दि. २ ऑक्टोबर २०१९ रोजी गांधी जयंतीच्या दिवशी तेथील महात्मा गांधींच्या रक्षा पात्राची चोरी झाली. शिवाय तेथील महात्मा गांधींच्या चित्राबर ‘गदार’असे शब्द लिहिण्यात आले, या घटनेचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ने तीव्र शब्दात निषेध केला आहे.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन यांनी पत्रका द्वारे निषेध केला आहे.

या गंभीर घटनेची गंभीर दखल ना राज्य सरकारने घेतली, ना केंद्रसरकारने दखल घेतली व ना माध्यमांनी घेतली. राष्ट्रपित्याचा अवमान करणारा हा प्रकार अतिशय संतापजन्य व निषेधार्य आहे. या निंदनीय घटनेचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी निषेध करीत आहे. राज्यसरकार व केंद्र सरकारकडे अशीमागणी करतो की, या प्रकरणातील गुन्हेगाराचा त्वरित शोध घ्यावा आणि कठोर कारवाई करावी.गांधींच्या रक्षाचे पात्र सरकारने ताब्यात घ्यावे आणि त्याचे सन्मानाने नदीत विसर्जन करावे.

अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात गांधीचे वास्तव्य होते. ही जागा देशातील व परदेशातील अनेकांना प्रेरणा देणारी जागा आहे. या आश्रमाची देखभाल करणाऱ्या विश्वस्तांना त्यांच्या ताब्यात असलेल्या आश्रमाची जागा ताबडतोब सोडण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे.

सरकारचे हे पाऊल खूप चिंताजनक आहे. महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात साधेपण व पावित्र्य हे महत्वाचे आहे. आश्रमाचे पावित्र्य टिकवून ठेवावे. शासनाने ही जागा ताब्यात घेतल्यास त्याचा व्यापारी उपयोग होईल अशी भीती आहे. गांधी विचाराशी विपरीत असलेल्या प्रवृत्तीचेही ते केंद्र ठरेल अशी शंका आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी सरकारकडे मागणी करीत आहे की आश्रमाची जागा ताब्यात घेण्याची नोटीस त्वरित मागे घ्यावी.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: