इतरचंद्रपूरपर्यावरणराज्यविदर्भसाहित्य

मुक्ताई येथे पर्यावरण शिक्षण शिबीर संपन्न

Spread the love

निखिल खानोरकर,(चिमूर चंद्रपूर) – चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर उपवनक्षेत्र व तरुण पर्यावरण वादी मंडळाच्या वतीने वन्यजीव सप्ताह निमित्य डोमा येथील मुक्ताई जंगलात एक दिवसीय पर्यावरण शिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात संस्कृती विद्यालय डोमा च्या साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या शिबिरात वन व वनौषधी या विषयावर सायगाटा येथील सूर्यभान खोब्रागडे वन्यप्राणी त्यांच्या पाऊलखुणा व विष्टा याची माहिती तरुण पर्यावरणवादी मंडळाचे सद्स्य आमोद गौरकर यांनी सांगितले .पर्यावरण व वाढते प्रदुषण या विषयावर वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवडे तर जंगलाचे महत्त्व या विषयावर मुख्याध्यापक प्रदीप गारघाटे सापाची ओळखं व गैरसमज या विषयावर विजय गजभे यांनी मार्गदर्शन केले.

ब्रह्मपुरी चे सहायक वनसंरक्षक आर एम वाकडे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना वनविभाग तर्फे जेवण देण्यात आले.प्रास्ताविकेतून वनपाल यु बी लोखंडे यांनी अन्न साखळी व वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व विषद केले संचालन वनरक्षक रुपेश केदार आभार वनरक्षक डब्लू टी नवघडे यांनी केले.

यशासीतेसाठी प्रदीप ढोणे रघु शेंडे सुनील लांजेवार जगू लांजेवार तरुण पर्यावरण मंडळा चे जगदीश पेंदम इम्तियाज शेख अमित शिवरकर कोमल भांडारकर संस्कृती विद्यालय चे शिक्षक अतुल राखडे वंदना बनसोड मंजुषा धारणेयांनी परिश्रम घेतले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: