पश्चिम महाराष्ट्रपुणेरणधुमाळीराज्य

दत्ता बहिरट यांच्यावर मतदारांकडून शुभेच्छांचा वर्षाव दुचाकी फेरीने प्रचाराला प्रारंभ; कार्यकर्त्यांचाही उत्सुफुर्त सहभाग

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – महाआघाडीचे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील उमेदवार व माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दुचाकी फेरीने प्रचाराला प्रारंभ केला. यावेळी फटाक्यांची अतिषबाजी, फुलांची उधळण आणि मतदारांनी बहिरट यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

या फेरीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अड. अभय छाजेड, काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, राष्ट्रवादीचे माजी स्थाई समिती अध्यक्ष निलेश निकम, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, सतीश धोत्रे ( माजी नगरसेवक), बाळासाहेब बोडके , राजू साने ( सामाजिक कार्यकर्ते) , माजी नगरसेवक उदय महाले, बाळासाहेब मारणे, राष्ट्रवादी प्रदेश कमिटीचे सदस्य प्रदिप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष साकी गायकवाड, सरचिटणीस सुजीत हांडे, शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सोनाली मारणे यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) व मित्र पक्ष आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बारामती हॉस्टेल येथून प्रचार फेरीला प्रारंभ होताच कार्यकर्त्यांनी उमेदवार व पक्षाच्या घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दणाणुन गेला. गोखलेनगर परिसरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी उमेदवाराचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महिलांनी औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. प्रचार फेरी मार्गावर प्रत्येक भागात आणि प्रत्येक चौकांत कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. फुलांची उधळण करीत बहिरट यांच्या प्रचार फेरीला प्रतिसाद दिला. सामाजिक संस्था, गणेश मंडळे, नवरात्र उत्सव मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघांसह मतदार संघातील किरकोळ विक्रेते, व्यापारी संघटना, कामगार, सोसायट्यांच्या पदाधिका-यांनी बहिरट यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.

बारामती हॉस्टेल येथून दुचाकी फेरीला सुरूवात झाली. त्यानंतर गोखलेनगर मुख्य रस्ता, वीर बाजीप्रभू शाळा, मॅफ्को, निलज्योती सोसायटी, जनवाडी ऑफिस, कुसाळकर चौक, वेताळ चौक, भाभा हॉस्पिटल, मारुती मंदिर गोलंदाज चौक, दीप बंगला चौक, गणेशखिंड रस्ता, ब्रेमेन चौक, परिहार चौक, औंध गाव, भाऊ पाटील रस्ता, बोपोडी, मानाजी बाग, खडकी, खडकी बाजार, येरवडा, मुळा रोड, वाकडेवाडी, संगमवाडी, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, फर्गसन रस्ता – ज्ञानेश्वर पादुका चौक, मॉडर्न कॉलेज, बालगंधर्व चौक, कॉंग्रेस भवनपासून रोकडोबा मंदिर येथे दाखल झाली. येथेच प्रचार फेरीचा समारोप झाला.

समारोपाच्या सभेत मोहन जोशी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रीय नेत्यांना पाहून मतदान केले. मात्र राज्यात अनेक प्रश्न आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले आहे. मंदीमुळे रोजच बेकारांच्या संख्येत भर पडत आहे. शेतकरी अडचणीत आहेत. फडणवीस सरकारने राज्याला समस्यांच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यात परिवर्तन अटळ आहे. आपण सर्वांनी भाजपचे अपयश मतदारांसमोर नेले पाहिजे. दत्ता बहिरट यांनी केलेल्या विकास कामांमुळे या मतदार संघात त्यांचा विजय निश्चित आहे.

अभय छाजेड म्हणाले-“भाजप 370 कलम रद्द केल्याचा राजकारणासाठी वापर करीत आहे. मात्र हे कलम रद्द केल्याने काश्मीरच्या जनतेचे काय नुकसान झाले. हे सत्यही लोकांना सांगितले पाहिजे. हे सरकार मंदीवर बोलण्यास तयार नाही. मंदीमुळे कंपन्या बंद पडत आहेत. तरुण बेरोजगार होत आहेत. शेती व शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे ते भाजपला मतदान करणार नाहीत. गरज आहे ती आपण लोकांपर्यंत पोहचण्याची”.

निलेश निकम म्हणाले-“शहरात भाजपाचे दोन खासदार, आठ आमदार आणि 99 नगरसेवक आहेत. शहरात पाणी, वाहतूक, कचरा आदी समस्या आहेत. धरणे भरली असताना पाणी कपात सुरू आहे. त्यामुळे सुज्ञ पुणेकर या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाहीत. चौकट शिवाजीनगरमध्ये बदल घडणार पक्षाचा कार्यकर्ता आणि नगरसेवक म्हणून या मतदार संघात अनेक विकासकामे केली आहेत”.

त्यामुळे या मतदार संघातील मतदार बदल घडविण्यास सज्ज झाले आहेत. महाआघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचा माझ्या कार्यावर विश्वास आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदार संघातील कार्यकर्ते स्वतः प्रचाराच्या कामाला लागले आहेत. हि केवळ दत्ता बहिरटांची निवडणूक नसून महाआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांची निवडणूक असल्याची भावना उमेदवार दत्ता बहिरट यांनी व्यक्त केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: