मुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांची माहिती

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची आज राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५५४३ उमेदवारांपैकी ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजुर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली.

आज छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ५६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०१ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६० उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १५१ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५९ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८१ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६६ उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७१ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ९० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १२५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ३२७ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५४ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८१ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३३ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २०८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २१२ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६९ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २५१ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २५ मतदारसंघात २७२ उमेदवार (वांद्रे पश्चिम मतदारसंघाची माहिती रात्री उशीरापर्यंत अप्राप्त), मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८४ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ११२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ३७२ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २०२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १२० उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २३७ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १०८ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४० उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २७ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १८६ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १११ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: