पश्चिम महाराष्ट्रपुणेरणधुमाळीराज्य

दत्ता बहिरट यांचे विरोधकांना चर्चेचे खुले आव्हान

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – शिवाजीनगर मतदार संघात काँग्रेस उमेदवार दत्ता बहिरट यांच्या प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) व मित्र पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची महत्वपुर्ण बैठकीत दत्ता बहिरट यांचे विरोधकांना चर्चेचे खुले आव्हान:

शनिवार दि.5 ऑक्टोबर 2019 रोजी सायं.6:00 वा. रोकडोबा मंदिर, गावठाण शिवाजीनगर येथे दत्ता बहिरट यांच्या प्रचारार्थ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला श्री. श्रीकांतभाऊ शिरोळे, मा.आ.दीप्तीताई चवधरी,मा.आ.कमलताई ढोले पाटील,मा.नगरसेवक निलेशजी निकम, उदय महाले, आनंदजी छाजेड, शिवाजीनगर ब्लॉक अध्यक्ष अजीज सय्यद,प्रदीप देशमुख,मा.नगरसेवक मनोहर नांदे,ऍड. औदुंबर पाटील,सुरेश पासलकर,खडकी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब आहिर, बोपोडी ब्लॉक अध्यक्ष राजेंद्र भुतडा, शेखर कपोते, अनिता पवार ताई,सुरेश कपोते,पुणे शहर राष्ट्रवादी सरचिटणीस शैलेश जी साठे,माजी उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे इ. पदाधिकारी ,ज्येष्ठ नागरिक,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीला संबोधित करताना दत्ता बहिरट यांनी आपल्या विजयाचा निर्धार व्यक्त करताना ईव्हीएम बाबत भीती बाळगू नका. विजय आपला पक्का असून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. मी आणि माझी कामाचे मला विजयी करतील.या परिसरामधीलच मी असल्याने या परिसरातील समस्या मला माहित आहे.मी या मतदारसंघातील सर्व विरोधी उमेदवारांना विकासाच्या व पारदर्शकतेच्या मुद्यावर शनिवारवाड्यावर खुल्या चर्चेचे आव्हान देतो.त्यांनी येऊन चर्चा करावी.

याप्रसंगी बोलतांना श्री.श्रीकांतभाऊ शिरोळे म्हणाले की या मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच येथील स्थानिक व शिवाजीनगर गावठाणातीळ उमेदवार मिळाला असून आपल्या माणसाला निवडून आणण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.

निष्क्रिय खासदारांचा निष्क्रिय नगरसेवक असलेल्या निष्क्रिय उमेदवाराला या भागातील जनता अक्षरशः कंटाळली असून आपला विजय पक्का आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: