पर्यावरणप्रशासनमुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

सर्वोच्च न्यायालयाकडून आरेतील वृक्षतोड तात्काळ थांबवण्याचे आदेश

Spread the love

मुंबई प्रतिनिधी –   प्रकाश आंबेडकर यांनी आरे जंगल तोडीला लोकशाही पद्धतीने विरोध दर्शवण्यासाठी आरे फिल्टरपाडा येथे जाऊन आंदोलन केले होते. राज्यभरात ठिकठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून  आरे जंगल वाचवण्यासाठी  आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे या विषयाकडे लक्ष वेधले आहे. या पत्राची दखल घेत दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने आरेतील वृक्षतोडीविरोधात सुमोटो याचिका दाखल केली आहे. आरे जंगल तोड प्रकरणी  सर्वोच्च न्यायालयाने विशेष खंडपीठ स्थापन केले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनीदेखील आंदोलन करत या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याप्रकरणी त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलने व निदर्शने केली होती. आरे वृक्षतोडप्रकरणी मुंबईकरांना व पर्यावरणप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. या मुळे मुंबईतील सर्व पर्यावरणप्रेमींनी प्रकाश आंबेडकरांचे आभार मानले आहे.

आरेतील झाडे तोडायला नको हवी होती, असे म्हणत न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती देत, ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आंदोलकांची सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दिले आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: