इतरपर्यावरणप्रशासनमुंबईमुंबईरणधुमाळीराज्यUncategorized

प्रकाश आंबेडकर यांना सरकारने केली अटक !

Spread the love

मुंबई प्रतिनिधी  – आरे जंगल तोडीला लोकशाही पद्धतीने   विरोध दर्शवण्यासाठी आरे फिल्टरपाडा येथे गेलेले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना सरकरने दडपशाहीचे धोरण राबवून अटक करण्यात आली. मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाने मुंबईतील शहर हद्दीत असणारे आरे जंगल परिसरात मेट्रोचे कारशेड उभारण्याचा मनमानी कारभार सुरू केलाय.

आज महाराष्ट्रातील वातावरण निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत आरे जंगलातील झाडे बेमालूमपणे तोडण्यात येत आहेत. अंधाराचा फायदा घेत आरे जंगल परिसरातील सुमारे ३०० झाडे तोडण्यात आली याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शासनाचा जाहीर निषेध केला.

रात्रीचा फायदा घेत आरे जंगलातील झाडे तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे हुकुमशाही धोरण राबुवून सरकार  आरे जंगल परिसराचा भाग बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. या प्रकरणात जे सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी विरोध करत आहेत अशांना   पोलिसांनी  ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा सरकारने हुकुमशाही पद्धत वापरून अटक करण्यात आली.

आरे जंगल तोडी बाबत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असल्याची दिसते . वंचित बहुजन आघाडी आरे मधील मेट्रो कारशेडच्या या प्रकल्पाला आणि जनहितार्थ कारणासाठी या सरकारचा निषेध केला.

 

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: