इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्यसामाजिक संस्था

तिरळेपणावर मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(पिंपरी पुणे) – डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट आणि पुणे नेत्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १७१ वे तिरळेपणावर मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय, पिंपरी येथे करण्यात आले आहे.

सदर शिबिरातील रुग्णांची नाव नोंदणी व तपासणी दि. ७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी ४ वा यावेळेत आयुर्वेद रुग्णालयाच्या शालाक्यतंत्र बाह्यरुग्ण विभाग क्र ६ (OPD NO 6) येथे करण्यात येणार असून शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या रुग्णांची दि. ८ नोव्हेंबर २०१९ रोजी अंतिम तपासणी करण्यात येईल व दि. ९ व १० नोव्हेंबर २०१९ रोजी शस्त्रक्रिया करण्यात येईल. शस्त्रक्रियेसह रुग्णांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था हि विनामूल्य करण्यात येईल.

या एक महिन्याच्या कालावधीत रुग्णालयाच्यावतीने जनहितार्थ घेण्यात येणाऱ्या तिरळेपणावर मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी ९९२१०३५६२२/ ७७९६६६३३६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: