मुंबईरणधुमाळीराज्य

अंधाराचा फायदा घेत आरे जंगलातील वृक्ष तोड ! वंचित बहुजन आघडी कडून जाहीर निषेध

Spread the love

मुंबई प्रतिनिधी –    मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाने मुंबईतील शहर हद्दीत असणारे आरे जंगल परिसरात मेट्रोचे कारशेड उभारण्याचा मनमानी कारभार सुरू केलाय. आज महाराष्ट्रातील वातावरण निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत आरे जंगलातील झाडे बेमालूमपणे तोडण्यात येत आहेत. संध्याकळी अंधाराचा फायदा घेत आरे जंगल परिसरातील सुमारे ३०० झाडे तोडण्यात आली याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शासनाचा जाहीर निषेध केला.

मुंबई महानगरपालिकेच्या ट्री ऑथेरेटीने १५ दिवस थांबण्याचे आदेश दिले असतांना महा नगरपालिकेने मनमानी पद्धतीने आरे जंगल तोडायला घेतलय. जी कार्यकर्ते याला विरोध करताय त्यांना पोलिसांनी चूकीच्या पद्धतीने अटक केलीय. अनेक महिलांना पुरुष पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या जंगल तोडीमुळे अत्यंत भयानक परिणाम मुंबईकरांना भोगावे लागतील. सध्या मुंबईची परिस्थिती पाहता श्वास घेणे देखील मुश्कील झाले आहे.सरकारच्या या विश्वासघातकी वृत्तीचा वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर निषेध करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: