इतरपरभणीमराठवाडाराज्यसाहित्य

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात महात्‍मा गांधी जयंती निमित्‍त स्‍वच्‍छ भारत हरित भारत अभियान

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(परभणी ) – वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात महात्‍मा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री जयंतीचे औजित्‍य साधुन दिनांक 2 ऑक्‍टोबर रोजी स्‍वच्‍छ भारत हरित भारत अभियानाचे आयोजन करण्‍यात आले होते. अभियानाचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर कुलसचिव श्री रणजित पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ भगवान आसेवार, डॉ जहांगिरदार, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले म्‍हणाले की, प्‍लॉस्टिकमुळे मोठया प्रमाणात पर्यावरणाचा –हास होत असुन सर्वांनी प्‍लॉस्टिकचा वापर पुर्णपणे बंद करावा. प्रत्‍येकांनी वैयक्‍तीक जीवनात परिसर स्‍वच्‍छतेसाठी आग्रही राहावे. स्‍वच्‍छ व हरित विद्यापीठाकरिता विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक व कर्मचा-यांनी योगदान देण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले.

यावेळी उपस्थित प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यींनी महाविद्यालय व वसतीगृह परिसर स्‍वच्‍छ केला. तसेच वृक्षलागवड अभियानात लागवड केलेल्‍या झाडांना व्‍यवस्थितरित्‍या आळे करण्‍यात आले व आळया भोवतालचे अनावश्‍यक गवत काढुन वरच्‍या बाजुस आच्‍छादन करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राष्‍ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ पपिता गौरखेडे, प्रा विजय जाधव, डॉ आनंद बडगुजर यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसेवकांनी व राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या छात्रसैनिकांनी डॉ एस व्‍ही कल्‍याणकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: