परभणीमदतीचा हातमराठवाडायोजनाराज्य

परभणीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी आता एजन्सी

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(परभणी) – युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेतून नव्याने सुरू होणारी पाणी पुरवठा योजना शास्त्रशुद्ध पद्धतीने राबविली जावी, त्याचप्रमाणे या योजनेसाठी लागणारा तांत्रिक मनुष्यबळाचा प्रश्न सुटावा, यासाठी ही योजना त्रयस्थ एजन्सीमार्फत चालविण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला असून, त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसांत परभणीकरांना मुबलक आणि नियमित पाणी पुरवठा होण्याची आशा निर्माण झाली आहे.परभणी शहराची नवीन पाणीपुरवठा योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे. योजनेची संपूर्ण कामे पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष पाणीपुरवठा करण्यासाठी अवघ्या काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र ही योजना दीर्घकाळ टिकविण्यासाठी परभणीकरांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही.

नवीन पदभरती करण्यासाठी आकृतीबंध मंजूर नाही. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय योजना चालविण्यासाठी अभियंता, तांत्रिकदृष्ट्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचीही आवश्यकता भासणार आहे. ही अडचण दूर करण्यासाठी मनपा आयुक्त रमेश पवार यांनी योजनेचा चालविण्याची आणि त्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचे काम एजन्सीमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाणी शुद्धीकरणापासून ते पाणी वितरणापर्यंतचे काम एजन्सी करणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रमाणित असलेली एजन्सी असावी किंवा पाणीपुरवठ्या अनुभव असणाऱ्यांना निविदा पद्धतीने काम दिले जाणार आहे. त्यासाठी ७ कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. आॅनलाईन पद्धतीने ही निविदा मागविण्यात आली असून, १० आॅक्टोबरही निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एजन्सी नियुक्त झाल्यास पाणीपुरवठा योजनेतील पाणी शुद्धीकरण, ब्लिचिंग पावडरची खरेदी, पाणी वितरण, मुख्य जलवाहिनीसह शहरातील जलवाहिनीचे लिकेज दुरुस्ती यासह नागरिकांच्या तक्रारी सोडवून त्यांना मुबलक पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी या एजन्सीवर राहणार आहे. यातून महानगरपालिकेतील मनुष्यबळाचा प्रश्न सुटणार आहे. शिवाय शहरवासियांना दररोज पाणी मिळण्याची हमीही मिळणार आहे. त्यामुळे एजन्सीच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याची कामे करुन शहरातील मागील अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: