परभणीमराठवाडारणधुमाळीराज्य

पाथरी विधानसभा मतदार संघात युतीच्या उमेदवाराचा स्टेज कोसळला

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(पाथरी -परभणी) – परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. मोहन फड यांच्या सभेचा स्टेज कोसळल्याची घटना गुरुवारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

पाथरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील घटक पक्ष रिपाइं आठवले गटाच्या वतीने गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आ.मोहन फड यांनी कार्यकर्त्यांना शहरातील नखाते पेट्रोलच्या बाजुला असलेल्या मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची या मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमण्यास सुरुवात झाली.

येथे उपस्थित कार्यकर्त्याना संबोधीत करण्यासाठी स्टेज उभारण्यात आला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास या स्टेजवर उमेदवार मोहन फड यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी स्टेजच्या क्षमतेपेक्षा अधिक पदाधिकारी आल्याने अचानक हा स्टेज कोसळला.

या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. त्यानंतर स्टेजच्या समोर येऊन उपस्थित नेते मंडळींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर माजलगावरोड- बाजार समितीमार्गे तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर आ.मोहन फड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: