औरंगाबादमराठवाडारणधुमाळीराज्य

शिवसेनेला धक्का : माजी आमदार अण्णासाहेब माने व युवासेना जिल्हाधिकारी संतोष माने ह्यांनी हाती घेतले घड्याळ

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(औरंगाबाद) –  शिवसेनेकडे असलेला गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने तालुक्यात पक्षात फूट पडली आहे. शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने आणि त्यांचे पुत्र युवासेनेचे जिल्हाधिकारी संतोष माने यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

अजित पवार यांच्या उपस्थितीत माने यांचा प्रवेश झाल्याने गंगापूर विधानसभा मतदारसंघातून संतोष माने यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे.

शिवसेनेकडून इच्छूक असलेले संतोष माने यांनी बंडाचे निशाण फडकवत शिवसेनेलाच जय महाराष्ट्र केला आहे. माजी आमदार आणि शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने यांच्यासह त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पक्षात प्रवेश केला. गंगापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्यासाठी सोडल्याने तालुक्यातील शिवसेनेते नाराजीचा सूर होता. त्याचे पडसाद अवघ्या दोन दिवसांत उमटतांना दिसत आहेत. माने पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्यामुळे शिवसेनेला ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का समजला जातोय.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: