मुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

“काँग्रेस पक्षाला माझी गरज आहे असं वाटत नाही”, संजय निरुपम नाराज

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज –  काँग्रेस नेते संजय निरुपम पक्ष नेतृत्त्वावर नाराज असून आपण प्रचारात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. काँग्रेस पक्षाला माझी गरज आहे असं वाटत नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे. ट्विटरच्या माध्यमातून संजय निरुपम यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

“ज्या पद्दतीने पक्ष नेतृत्त्व मला वागणूक देत आहे ते पाहता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा दिवस लांब आहे असं वाटत नाही,” असा सूचक इशाराही संजय निरुपम यांनी दिला आहे.संजय निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “काँग्रेस पक्षाला माझी गरज आहे असं वाटत नाही. मी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतून एकच नाव सुचवलं होतं. पण त्याचीही दखल घेण्यात आली नाही आणि नाव फेटाळण्यात आलं. मी पक्ष नेतृत्त्वाला असं झाल्यास प्रचारात सहभागी होणार नाही असं आधीच सांगितलं होतं. हा माझा अंतिम निर्णय आहे”.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: