इतरकोकणराज्यरायगडसाहित्य

श्रीवर्धन आगारात महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महा स्वच्छता अभियान संपन्न

Spread the love

विश्वास गायकवाड ,(माणगांव रायगड ) – राज्य परिवहन श्रीवर्धन आगारात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त आगारात महा स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी आगार व्यवस्थापक मा. जुनेदी म ब यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणेंत आला त्यानंतर त्यांनी त्यांच्या मनोगता मध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनावर विस्तृत स्वरूपात उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले.

आगार व्यवस्थापक जुनेदी आपल्या मनोगतात म्हणाले की, महात्मा गांधी हे नाव उच्चारताच भारतीय स्वातंत्र्यलढा डोळ्यासमोर येत असला तरी महात्मा गांधी हे फक्त स्वातंत्र्यापुरते मर्यादित नव्हते. तर देशाच्या जडणघडणीत त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे आपण विसरता कामा नये.

महात्मा गांधींनी समाजात सामाजिक विचारांचा पाया रचला. त्याच बरोबर सत्य, अहिंसा, प्रेमाचा संदेश देत सत्याग्रहाच्या मार्गाने समाजाला संघटित केले. जनभावनेचा आदर राखून आपले विचार मांडण्याच्या गांधींच्या वृत्तीनेच हे शक्य झाले. अर्थात त्यांनी जमावाच्या चुकीच्या गोष्टींचे कधीच समर्थन केले नाही.

सत्य, अहिंसा आणि प्रेम याद्वारे पुढे जाणारा समाजच अधिक प्रगत समाज असू शकतो.असे मत व्यक्त केले.तसेच महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्तानेआगारातील संपूर्ण परिसर आणि बस स्थानक रा प कर्मचारी वर्गाकडून स्वच्छ करण्यासाठी श्रीवर्धन आगारात महा स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. या वेळी श्री राहुल गायकवाड कास्ट्राईब रा प संघटना सचिव, श्री नारायण पवार, (स.वा.नि) सौ शर्वरी लांजेकर, (वा.नि) प्रदीप विचारे, (स.का.आ.) सागर वाढवळ रामदास वैरागड, शंकर इंगोले, मंगेश चांदोरकर, गोविंद खटके, श्रीकृष्ण कराड, राजेश थोरे, श्रीकांत ठोसर, तानाजी वावरगिरे ,आणि मोठ्या संख्येने रा प कर्मचारी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: