इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातयोजनाराज्य

ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी व हितासाठी सासवड येथे कार्यालय

Spread the love

 महाराष्ट्र विश्व न्यूज ,( सासवड पुणे)- ग्राहक हिताच्या चळवळीत अग्रगण्य अशा ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन सासवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी दिप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे कार्यवाह सतीश साकोरे,सचिव प्रविण गव्हाणे,सदस्य उत्तमराव झेंडे,संतोष मगर,रविंद्र ताकवले यांनी मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष काकडे म्हणाले की ग्राहक कल्याण फाउंडेशनचे काम हे सर्वांसाठी आहे.नागरिकांना महसूल, ग्रामपंचायत,पंचायत समिती,भूमी अभिलेख,पोलीस स्टेशन,महावितरण आदी सेवा विषयी लागणारी सर्व मदत केली जाईल.ग्राहकांना न्याय देण्याचे काम केले जाईल.

यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष काकडे यांनी केले तर आभार सचिव चंद्रकांत चौंडकर यांनी मानले.ग्राहक कल्याण फाऊंडेशचे कार्यलय पंचायत समिती पुरंदर जवळ सोनोरी रोड जवळ आहे.ग्राहकांना मदत लागल्यास **9421854377** या नंबर वर संपर्क साधवा.असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: