चंद्रपूररणधुमाळीराज्यविदर्भ

मतदारांना प्रेरीत करण्यासाठी शपथ – रॅलीच्या माध्यमातुन मतदार जनजागृती

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(चिमूर चंद्रपूर)- महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चिमूर विधानसभा क्षेत्रात मतदान शंभर टक्के व्हावे या करीता जनजागृती पथका द्वारे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत .मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत  चिमूर निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालय, ग्रामागिता महाविद्यालय तथा नेहरू कणिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदारांना प्रेरीत करण्यासाठी शपथ घेण्यात आली .

चिमूर विधानसभा निवडणुक जनजागृती पथका द्वारे चिमूर शहरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालय , ग्रामगीता महाविद्यालय तथा नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक , प्राध्यापक तथा विद्यार्थ्यांसह रॅली काढण्यात आली .या रॅली मध्ये काही विद्यार्थी सायकलवरून तर काही विद्यार्थी मोटरसायकल द्वारे सहभागी झाले . चिमूर शहरातील मूख्य मार्ग वस्ती मधुन जनजागृतीपर घोषणा देत मतदान जनजागृती रॅली महसुल भवन परीसरात आली .

२१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकी मध्ये सगळ्या मतदारांनी आपला मताधिकार बजवावा याकरीता सगळ्यांनी प्रयत्न करावे असे निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांनी उपस्थितांना आवाहन केले .कुंटूबातील , परीसरातील, गावातील मतदारांना प्रेरीत करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याने उपस्थित सगळे कर्मचारी , शिक्षक , प्राध्यापक वृंद यांना शपथ देण्यात आली .

पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती मध्ये सहभाग घेतला . या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संपकाल ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय  नागटिळक, मनोहर चव्हाण ,नायब तहसीलदार श्विश्वनाथ दरबे  व  लोखंडे  ,स्विफ् नोडल अधिकारी  मुदखेड  , सहाय्यक नकाते ,केदार ,तूर्के उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: