परभणीमदतीचा हातमराठवाडाराज्यसामाजिक संस्था

नवरात्रीनिमित्त 3 निराधार एचआयव्ही संक्रमित मुलींना स्वयंरोजगार व उपजीविकेसाठी शिलाई मशीनची मदत

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(परभणी) – होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्था मागील 11 वर्षा पासून एचआयव्ही संक्रमित व अनाथांच्या मूलभूत प्रश्न शिक्षण, आरोग्य व पुनर्वसनपर गरजांसाठी नियमितपणे प्रयत्न करते. तसेच एचएआरसी संस्थे तर्फे आजवर महाराष्ट्रातील अनेक विशेष बालगृहातील एचआयव्ही ग्रस्तांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन साठी वेळोवेळी मदत केली जात आहे. शिवाय डिसेंबर 2018 पासून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील एआरटी विभागात उपचार घेणाऱ्या 100 दुर्धर आजारग्रस्त रुग्ण विशेषतः बालकांना पोषक आहार व महिलांना सॅनिटरी नॅपकिन, लहान मुलांसाठी चाईल्ड कॉर्नर, या पूर्वी 2 अनाथ मुलींना शिलाई मशीन आदी विविध गरजू रुग्णासाठी वेगवेगळ्या सामाजिक उवक्रमातून नियमितपणे मदत सुरू आहे.

हेच कार्य करतांना एआरटी केंद्रात उपचार घेणाऱ्या व परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या 3 निराधार एक पालक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल परिस्थितीत स्वतःचे शिक्षण घेऊन, विविध काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी होण्यासाठी मदतीची गरज होती.म्हणून सध्या नवरात्रीचे औचित्य साधून ‘स्त्रीशक्तींचा सन्मान’ कार्यक्रम एचएआरसी संस्थे तर्फे एआरटी विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, चंद्रकांत अमीलकंठवार, सत्यनारायण चांडक, एआरआटी विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सौ मंजुषा कुलकर्णी, डॉ सौ पालवे मॅडम, डॉ मार्डीकर , अनुराधा बेर्डे, सुरेखा जाधव, विठ्ठल गलांडे, विशाल कापरबोईना, सरस्वती बिडकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ मंजुषा कुलकर्णी यांनी केले.

एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांनी एचआयव्ही व अनाथांसाठी एचएआरसी संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती देताना म्हणाले ” समाजातील दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना स्वावलंबी होण्यासाठी व स्वयंरोजगार व प्रशिक्षन साठी जी पण भविष्यात मदत लागेल ती एचएआरसी संस्थेतर्फे पुरविली जाईल.सर्व रुग्णांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन नियमितपणे उपचार, पोषक व संतुलित आहार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या सुख दुःखात एचएआरसी संस्था सदैव आपल्या सोबत आहे”.
डॉ पालवे यांनी एचएआरसी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करतांना म्हणाले”प्रत्येक रुग्णांना स्वावलंबी बनविण्यासाठी एचएआरसी संस्थेच्या हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे”.

सौ अनुराधा बेर्डे यांनी आभार मानले.
शेवटी विविध ग्रामीण भागातून उपचार घेण्यासाठी आलेल्या 3 निराधार एचआयव्ही संक्रमित मुलींना एचएआरसी संस्थेतर्फे मान्यवरांच्या हस्ते नामांकित कंपनीच्या 2 शिलाई मशीन व 1 फॉल पिको मशीन सुपूर्द करण्यात आल्या.या प्रसंगी एआरटी विभागात उपचार घेणारे रुग्ण, स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, चंद्रकांत अमीलकंठवार, सत्यनारायण चांडक, विशाल राका व एचएआरसी संस्था तथा एआरटी विभागाच्या सर्व स्टाफ यांनी प्रयत्न केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: