बीडमराठवाडारणधुमाळीराज्य

गेवराईचा आमदार हा वंचित बहुजन आघाडीचाचं होणार – सय्यद सुभान

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(बीड) – महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी या पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रत ताकदीनिशी ४८ लोकसभा जागा लढवली आणि प्रस्थापित पक्षाला आपली राजकीय ताकद मताच्या माध्यमातून दाखवून दिली. त्यामुळे महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षाचा दर्जा आणि निवडणूक चिन्ह मिळाले असुन, एक प्रबळ पक्ष म्हणून उदयाला आला. तो आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीनिशी वंचित घटकाला सोबत घेऊन सर्व जागा लढवणारा एकमेव पक्ष ठरणार आहे.

तसेच गेवराई मतदारसंघातुन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मा.इंजि.विष्णू देवकते यांना निवडून आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षाच्या सहकार्याने त्यांना विधानसभेत पाठवणार असे एका पत्रकाद्वारे तालुकाध्ययक्ष मा.सय्यद सुभान व्यक्त केले आहे.

राजकारणात या देशातील व राज्यातील वंचित उपेक्षित व बहुजन समाजाला या देशाची शासन कर्ती जमात करण्यासाठी ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व वंचिताना एकत्र करून या देशांतील व राज्यातील प्रस्थापितांची राजकारणातील घराणेशाही व मक्तेदारी मोडीत काढली असून बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी पुर्ण ताकतीने लढवणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकी मध्ये वंचित बहुजन आघाडीला लोकसभेला 92168 मते मिळाली आहेत लोक सभेला मतदारांच्या मिळालेला प्रतिसाद आणि विधानसभेला वंचित बहुजन आघाडीला वाढता पाठिंबा पाहता वंचित बहुजन आघाडी सहा विधानसभेला आपले उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे केले आहेत, आणि या महाराष्ट्राच्या विधान भवनावर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकणार आहे असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुकाध्यक्ष मा.सय्यद सुभान व्यक्त केला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: