इतरनांदेडमराठवाडाराज्यसाहित्य

36 वर्षाच्या संघटना निष्ठेतुन झाली 50 शेतकरी आंदोलने

शेतकरी संघटनेच्या वलयाने ध्येयवेड्याचा त्याग,चिंचाळात घर तीथे संघटनेचा बिल्ला - नामशेष बिल्ला संस्कृतीचे असेही जतन

Spread the love

विचार कोणताही आणि कसलाही असो त्या विचाराने प्रेरीत होत ध्येयप्राप्तीच्या दिशेने निघालेल्या व्यक्तींच्या समोर परीणामाची चिंता नसते .स्वतः उध्वस्त होऊन , नुकसान सोसुन इतरांना त्याचा लाभ व्हावा अशी प्रवृत्ती सद्या समाजात दुर्मिळ आहेत.अश्याच ध्येयाने पेटलेल्या एका शेतक-याने शेतकरी संघटनेच्या माध्यमातुन 36 वर्षात 50 हुन अधिक आंदोलने केली इतकेच नाही तर कृती आणि आचरणातुन संघटनेचे हीत साकारले. अख्या गावालाच वेड लावले त्यामुळे प्रत्येक घरात बिल्ला झळकु लागला.सद्या एकीकडे संघटना मृतप्राय अवस्थेत असतांना चिंचाळ्यात माञ याउलट परिस्थिती दिसते.

चिंचाळा बिलोली तालुक्यातील 2000 लोकसंख्येचे दिवंगत शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचा मोठा प्रभाव असलेले गाव ! याच गावातील शिवराज पाटील थडीसावळीकर ह्या 67 वर्षीय शेतक-याने साधारण 36 वर्षापुर्वी दिवंगत नेते शरद जोशी यांच्या शेतकरी विचाराचा पगडा पाडला . त्यातुनच पाटील यांची संघटनेशी नाळ जुळली ती आजतागायत कायम आहे.ह्या गावाला पाटील संघटनेच्या बिल्ल्यांचे गांव अशी ओळख निर्माण करुन दिली आहे.

प्रत्येक घरातील किमान एखाद्या व्यक्तीच्या शर्टावरील खिशाला बिल्ला आहेच आहे.अनेक गावात आपण महापुरुषांचे पुतळे पाहतो .माञ येथे शेतक-यांच्या मुर्तीचा पुतळा आहे.गावातील प्रवेशद्वावर बळीराजा किसानतीर्थ अश्या कमानी लावल्या .गावात तीन ते चार ठिकाणाहुन प्रवेश करता येतो.सगळ्याच मार्गावर बळीराज्य असे फलक लावले. या सगळ्या घटनेमागे पाटील यांचीच प्रेरणा आहे.

सध्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असणारे हे शिवराज पाटील यांनी स्वतःच्या निवासावर बळीराजा लिहले. बैठकीत नांगर ( हल ) दर्शनी भागात दिसेल.घरातल्या प्रत्येक वस्तुवर संघटनेचा लेबल आहे.मुलांची लग्ने संघटनेच्या मंगलाष्टके व श्लोकांने केली.ते स्वतः लग्नात शरद जोशी यांचे पुस्तके देतात. धोती – सदरा अनवाणी आणि हातात कर्जमुक्ती सोट्या ( लाकुड ) अश्या पेहेरावात नेहमी असणारे ह्या गृहस्थाने दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांना 2006 ला चिंचाळ्यात बोलवुन त्यांच्या हस्ते शेतकरी मुर्ती ( पुतळा ) चे उद्घाटन केले . पुण्यातील आंबेठाण येथे जोशी यांच्यासमवेत अनेकदा हे गृहस्थ मुक्कामी होते.

1983 पासुन संघटनेला वाहुन घेतलेल्या पाटील यांनी आजतागायत तब्बल 50 हुन अधिक आंदोलने केली .अनेकदा गुन्हे दाखल झाले जेलचीही हवा खावी लागली माञ आपल्या ध्येयापासुन ते ढळले नाहीत.त्यांच्या सोबतची अनेक सहकारी संघटना सोडली माञ पाटील हे ठाम राहीले.इतकेच नाही तर ते ज्या गावात वास्तव्यास आहेत त्याच गावात प्रत्येक घरात संघटनेचा बिल्ला आहे.कर्नाटक , नर्मदा सरोवर , केरळ , दिल्ली , मुंबई , चंदिगड (पंजाब ), नागपुर , चंद्रपुर ,नाशिक येथे अधिवेशनात सहभाग घेतला. 1995 ला शरद जोशी बिलोली विधानसभेचे ऊमेदवार असतांना पाटील यांच्यावर मोठी धुरा होती.

सद्याच्या या पटलावरशेतकरी संघटनेचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर असतांना चिंचाळसारख्या गावात शिवराज पाटील यांच्यासारख्या ध्येयवेड्या शेतक-यांनी संघटनेला जिवंत ठेवले. गावात कृती केली . बळ दिले त्यामुळे संघटनेचे अस्तित्व अबाधित आहे.

 

– निखिल खानोलकर , नांदेड
Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: