अहमदनगरउत्तर महाराष्ट्ररणधुमाळीराज्य

उमेदवारी अर्ज भरण्याकरिता आलेल्या इच्छुकास भरावा लागला दंड

Spread the love
महाराष्ट्र विश्व न्यूज ,(नेवासा-अहमदनगर) – नेवासा मतदारसंघात 10 हजार अनामत रक्कम सुट्ट्या नाण्यांच्या स्वरूपात प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन येणाऱ्या स्टंटबाज व्यक्तीस 5000 दंड भरावा लागला आहे.
नाणे कायदा 2011 चे कलम 6(1) नुसार नाण्यांच्या स्वरूपातील रक्कम केवळ हजारपर्यंत कायदेशीरदृष्ट्या चलन म्हणून स्विकारता येते. तसेच प्लास्टिकच्या वापरावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली असून प्लास्टिक पिशवी वापरल्यास पहिल्या वापराबाबत 5000, दुसऱ्यांदा वापरल्यास 10 हजार, तिसऱ्यांदा वापरल्यास 25 हजार दंड आणि 3 महिने कारावासाची तरतूद आहे. नेवासा सहायक निवडणूक अधिकारी समीर शेख यांनी ही कारवाई केली.
Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: