इतरनाशिकराज्यसाहित्य

मनमाड रेल्वे स्थानकात प्लास्टिक बाटली क्रशिंग मशिनचा शुभारंभ

Spread the love

 महाराष्ट्र विश्व न्यूज ,(मनमाड-नाशिक) – भारताचे शक्तीशाली पंतप्रधान व विश्‍वनेते आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी येत्या 2 ऑक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण देशभरामध्ये प्लॅस्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने मनमाड रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे प्रशासनाने प्लास्टिक बाटली क्रशिंग मशिन फलाट क्र.3 वर बसविली आहे.

भाजपचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष व मध्य रेल्वेच्या मुंबई क्षेत्राच्या क्षेत्रीय समितीचे सदस्य नितीन पांडे, भुसावळ रेल्वे समितीचे कांतीलाल लुणावत यांच्या उपस्थितीत व हस्ते या बाटली क्रशिंग मशिनचा प्रातिनिधीक स्वरुपात शुभारंभ झाला. या मशिनमध्ये फक्त प्लास्टिक बॉटल टाकता येणार आहे. त्या बाटलीचे झाकण टाकता येणार नाही. तसेच प्लास्टिक व्यतिरीक्त जे साहित्य आहे ते देखील त्यात टाकता येणार नाही.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिक मुक्त हिंदुस्थानचा संकल्प केला असून रेल्वे प्रवाशांनी व सामान्य नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत रेल्वे स्थानकात स्वच्छता ठेवत पाण्याच्या बाटल्या या मशिनमध्ये नष्ट करावयाच्या आहेत असे आवाहन याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष व रेल्वे क्षेत्रीय समिती सदस्य नितीन पांडे यांनी केले त्याचबराेबर या प्लास्टिक बाटली क्रशिंग मशिनवर इंग्रजी सूचना आहेत. त्या सर्वसामान्य प्रवाशांना कळणार नाही म्हणून याठिकाणी रेल्वे प्रशासनाने या मशिन वापराच्या माहितीचा डिजीटल सूचना फलक मराठी व हिंदी भाषेमध्ये त्या मशिनजवळ लावावा व अशा पध्दतीची बाटली क्रशिंग मशीन सर्वच प्लॅटफार्मवर बसवावे अशी मागणी रेल्वे प्रशासनाला करणार असल्याचे याप्रसंगी नितीन पांडे यांनी सांगितले.

या प्लास्टिक बाटली क्रशिंग मशिनमध्ये जमा होणार्‍या प्लास्टिक कचर्‍याची विल्हेवाट रेल्वे प्रशासन लावणार आहे. यामुळे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता होण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमास भाजप नाशिक जिल्हा चिटणीस नारायण पवार, भाजप जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन दराडे, शहर उपाध्यक्ष नितीन परदेशी, युवा मोर्चा अध्यक्ष संदिप नरवडे, अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष बुढनबाबा शेख, आशिष चावरीया , सचिन जाधव, युवा मोर्चा सरचिटणीस नारायण जगताप, बिट्टू कसबे, बाळा गांगुर्डे आदी प्रमुख पदाधिकार्‍यांसह मोठ्या संख्येने रेल्वे प्रवासी व नागरिक उपस्थित होते.

 

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: