चंद्रपूररणधुमाळीराज्यविदर्भ

मतदान कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(चिमूर-चंद्रपूर) – भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रराज्य विधानसभा निवडणुकी करीता ७४ चिमूर विधानसभा क्षेत्रात युद्ध पातडीवर तयारी सुरू आहे . जिल्हा निवडणुक अधिकांराच्या निर्देशाप्रमाणे मतदान पथकातील क्षेत्रीय अधिकारी , केंद्राध्यक्ष , प्रथम मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी इत्यादी सर्व कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शहिद बालाजी रायपुरकर सांस्कृतीक सभागृहा मध्ये संपन्न झाले .

७४ चिमूर विधानसभा सार्वत्रीक निवडणुकी करीता नियुक्त सर्व मतदान अधिकाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण चिमूर येथे संपन्न झाले . या प्रशिक्षणा मध्ये निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चिमूर प्रकाश संकपाल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले .मतदान कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना दृकश्राव्य माध्यमांचा वापर करीत त्यांच्या सर्व शंकाचे निरसन केले .ई व्हि एम हाताळण्याविषयी प्रात्याक्षीक भारत ईलेक्ट्रान लि . च्या तज्ञानी दिले .

१७०० मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रीकेसाठी विशेष कक्ष उघडून सगळयांना नमूना १२चा अर्ज उपलब्ध करून दिला .सर्व मतदान अधिकारी व कर्मचानी टपाली मतपत्रीकेकरीता विशेष कक्षात अर्ज भरूण दिला .या दोन दिवसीय प्रशिक्षणात सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संजय नागटिळक , नागभिडचे तहसीलदार मनोहर चव्हाण , भिसी अप्पर तहसीलदार परीक्षीत पाटील , नायब तहसीलदार ( निवडणुक ) विश्वनाथ दरभे उपस्थित होते .

विधानसभा सार्वत्रीक निवडणुकी करीता नियुक्त खर्च निरीक्षक के . विनोद कुमार यांनी चिमूर निवडणुक विभागाला भेट दिली .स्थिर निगराणी पथकाला भेट देऊन त्यांना उमेदवार सादर करणार असलेल्या सर्व प्रकारच्या खर्च ,नोंदी , तपशील या विषयी दिशा निर्देशन केले . तथा सर्व निवडणुक यंत्रणेचा आढावा घेतला .

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: