आरोग्यइतरचंद्रपूरराज्यविदर्भ

काजळसर वाशीय जनता प्राथमिक उपचारा पासून वंचित

उपपप्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर ..

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(चिमूर-चंद्रपूर) – चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या काजळसर येथील उपप्राथमिक आरोग्य केंद्राची अवदशा झाली आहे. या उपकेंद्रात दोन परिचारिका कार्यरत असून कुणीही मुख्यालयी राहत नाही व उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना उपचारविना परत जावे लागतें. त्यामुळे काजळसर वाशीय जनतेला उपचारा पासून वंचित राहावे लागत आहे.

काजळसर हे मोठे गाव असून इथे उप प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु या केंद्रावर कुणीही हजर राहत नाही तसेच या केंद्रात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून गवत, झाडे झुडपे वाढलेले दिसून येत आहे. या केंद्रावर दोन परिचारिका नेमलेल्या आहेत परंतु त्या पण उपस्थित राहत नाही. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचारविना परत जावे लागते.

सध्या साथीच्या आजाराचे थैमान सुरू आहे त्यामुळे प्राथमिक उपचार करण्यासाठी रुग्ण येतात त्याना औषधी सुद्धा मिळत नाही त्यामुळे ते खासगी दवाखान्यात जातात आणि उपचार करून घेतात त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड पडत आहे. शासनाने जनतेच्या आरोग्य सुदृढ राहावे त्यांना प्राथमिक उपचार मिळावे यासाठी आरोग्य केंद्राची निर्मिती केली असून रुग्णाच्या सेवेसाठी भरपूर प्रमाणात निधी व सोयी उपलब्ध करते परंतु परिचारिका हजर राहत नसल्याने त्यांना सोयी सुविधाचा लाभ मिळत नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

रात्री अपरात्री कुणाची प्रकृती बीघडली तर त्या रुग्णाला उपचार मिळत नाही कारण मुख्यालयी कोणीही राहत नाही आणि शासनाने मुख्यालयी कर्मचारी हजर राहावे असे नियम काढले आहे.तसेच गरोदर स्त्रिया सर्वसामान्य रुग्ण याना सोयी सुविधा मिळत नाही. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात किंवा नेरी केंद्रात जावे लागते. त्यामुळे हे उपकेंद्र वाऱ्यावर असून येथील कारभार रामभरोसे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या बाबीची दखल घेऊन उप प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून रुग्णांना सोयी सुविधा देऊन उपचार करावे, अशी मागणी काजळसर वाशीय जनता करीत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: